लोकसभा निवडणुकांमुळे बदलले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या काेणती परीक्षा हाेणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 08:05 AM2024-04-03T08:05:07+5:302024-04-03T08:05:24+5:30

Lok Sabha Election 2024: येत्या १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बदलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जेईई मेन, एमएचटी-सीईटी आदी परीक्षांचा समावेश आहे. 

Lok Sabha Election 2024: Exam schedule changed due to Lok Sabha elections, know how many exams will be held when? | लोकसभा निवडणुकांमुळे बदलले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या काेणती परीक्षा हाेणार कधी?

लोकसभा निवडणुकांमुळे बदलले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या काेणती परीक्षा हाेणार कधी?

 नवी दिल्ली - येत्या १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बदलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जेईई मेन, एमएचटी-सीईटी आदी परीक्षांचा समावेश आहे. 
परीक्षार्थींना कोणताही त्रास होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जेईई ॲडव्हान्स्ड (२६ मे ) व  नीट यूजी परीक्षा (५ मे) या तारखांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

जेईई मेन २०२४- ४ ते १२ एप्रिल. 
एमएचटी-सीईटी (पीसीएम व पीसीबी) परीक्षा- २ मे ते १७ मे पीसीबी ग्रुप - २२ ते ३० एप्रिल. 
यूपीएससी परीक्षा - १६ जून.
नीट पीजी २०२४- २३ जून (निकाल १५ जुलैला जाहीर होईल.)
आयसीएआय सीए- ग्रुप १ साठी होणाऱ्या परीक्षा ३, ५, ९ मे २०२४, तर ग्रुप २ साठी होणाऱ्या परीक्षा आता ११, १५ व १७ मे रोजी. 
सीयूईटी यूजी परीक्षा - विचार सुरू.

महाराष्ट्रातील परीक्षांचे वेळापत्रक
परीक्षेचे नाव                परीक्षेचा कालावधी
एमएचटी-सीईटी २०२४ पीसीबी       एप्रिल २२, २३, २४, २८, २९, ३०
एमएचटी-सीईटी २०२४ पीसीएम      मे २, ३, ४, ९, १०, ११, १५, १६, १७
एमएएच-एएसी सीईटी               १२ मे
एमएएच-बीए/बीएस्सी बीएड सीईटी      १८ मे
एमएएच-एलएलबी ५ वर्षे सीईटी       १८ मे
एमएच-नर्सिंग सीईटी        २४ व २५ मे
एमएएच-बीएचएमसीटी सीईटी     २२ मे
एमएएच-बीबीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएमसीईटी     २७ ते २९ मे
 

Web Title: Lok Sabha Election 2024: Exam schedule changed due to Lok Sabha elections, know how many exams will be held when?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.