जातिनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये मतभेद, बड्या नेत्याने खर्गेंना पत्र लिहून राहुल गांधींना घेरले 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 06:28 PM2024-03-21T18:28:38+5:302024-03-21T18:29:17+5:30

Lok Sabha Election 2024: मागच्या काही काळापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) जातिनिहाय जनगणनेबाबत (caste-based census) आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या या भूमिकेला आता काँग्रेस (Congress) पक्षामधूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी राहुल गांधी यांच्या जातिनिहाय जनगणनेबाबतच्या विधानावर टीका करत नराजी व्यक्त केली आहे. 

Lok Sabha Election 2024: Disagreement in Congress over caste-based census, Anand Sharma writes letter to Kharg, surrounds Rahul Gandhi | जातिनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये मतभेद, बड्या नेत्याने खर्गेंना पत्र लिहून राहुल गांधींना घेरले 

जातिनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये मतभेद, बड्या नेत्याने खर्गेंना पत्र लिहून राहुल गांधींना घेरले 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी हे जातिनिहाय जनगणनेला प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा बनवण्याची शक्यता आहे. मागच्या काही काळापासून राहुल गांधी जातिनिहाय जनगणनेबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या या भूमिकेला आता काँग्रेस पक्षामधूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या जातिनिहाय जनगणनेबाबतच्या विधानावर टीका करत नराजी व्यक्त केली आहे. 

आनंद शर्मा यांनी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रामधून आनंद शर्मा यांनी जातिनिहाय जनगणना हा काही रामबाण उपाय नसल्याचे म्हटले आहे. तसेच असं करणं म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या वारशाच्या अपमान करण्यासारखं ठरेल, असंही आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आनंद शर्मा यांनी काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि व्यापक दृष्टीकोनाची आठवण काढताना या पत्रामधून इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी दिलेल्या घोषणांचेही उदाहरण दिले. पक्षाची सध्याची भूमिका ही मागच्या काँग्रेस सरकारच्या विचारसरणीसोबत जुळत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधकांना चिखलफेक करण्याची संधी मिळणार आहे, असे आनंद शर्मा यांनी सांगितले. तसेच त्यांनी १९८० मध्ये काँग्रेसने दिलेल्या ‘ना जात पर ना पात पर, मुहर लगेगी हातपर’ या घोषणेचाही हवाला दिला.

या पत्रामधून आनंद शर्मा यांनी राजीव गांधी यांच्या एका वक्तव्याचंही उदाहरण दिलं आहे. त्यात १९९० मध्ये विरोधी पक्ष नेते असलेले राजीव गांधी यांनी सांगितले होते की, जर आपल्या देशात जातिवाद प्रस्थापित करण्यासाठी जातीची व्याख्या केली जात असेल, तर त्यापासून आम्हाला अडचण आहे. जर संसदीय आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जातिवाद हा एक विषय बनला तर त्यामुळे आपल्यासाठी समस्या निर्माण होतील. अशा परिस्थितीत काँग्रे बघ्याची भूमिका घेऊन या देशाचं विभाजन होत असलेलं बघत राहू शकणार नाही. 

Web Title: Lok Sabha Election 2024: Disagreement in Congress over caste-based census, Anand Sharma writes letter to Kharg, surrounds Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.