ममता बॅनर्जींसोबत मुस्लीम तर भाजपसोबत...! पश्चिम बंगालमध्ये खरी ठरणार का प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 06:05 PM2024-04-09T18:05:28+5:302024-04-09T18:06:35+5:30

प्रशांत किशोर म्हणाले, आपल्याला आश्चर्य वाटेल. पण भाजप पश्चिम बंगालमध्ये क्रमांक एकचा पक्ष बनू शकतो.

lok sabha election 2024 bjp may be number one party in west bengal says prashant kishor prediction talking about TMC also | ममता बॅनर्जींसोबत मुस्लीम तर भाजपसोबत...! पश्चिम बंगालमध्ये खरी ठरणार का प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी?

ममता बॅनर्जींसोबत मुस्लीम तर भाजपसोबत...! पश्चिम बंगालमध्ये खरी ठरणार का प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी?

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर, भाजप स्वतःच्या बळावर 370 पर्यंत पहोचू शकणार नाही. त्यांना 300 हून अधिक जागा मिळू शकतात, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ते पुढे हसत म्हणाले, एनडीएच्या 400 जागा येतीलच, कारण जो जिंकेल तो एनडीएमध्ये जाईल. एवढेच नाही तर, तामिळनाडूमध्ये भाजपचे व्होट शेअरिंग वाढेल, तो पहिल्यांदाच डबल डिजिटमध्ये असेल. तेलंगाणामध्ये भाजप पहिल्यांदाच दुसरा मोठा पक्ष बनेल. ओडिशात भाजप क्रमांक एकचा पक्ष होईल. तसेच पश्चिम बंगालमध्येही भाजप पहिल्या क्रमांकावर राहू शकतो, अशी भविष्यवाणीही प्रशांत किशोर यांनी केली आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

भाजप पश्चिम बंगालमध्ये क्रमांक एकचा पक्ष बनू शकतो -
प्रशांत किशोर म्हणाले, आपल्याला आश्चर्य वाटेल. पण भाजप पश्चिम बंगालमध्ये क्रमांक एकचा पक्ष बनू शकतो. लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास, 2019 मध्ये टीएमसीला 43.3 टक्के मतांसह 22 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला 40.2 टक्के मतांसह 18 जागा मिळाल्या होत्या. ही आकडेवारी पाहता, 1-2 टक्क्यांनीही खेला होऊ शकतो. यावेळी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखली घटनेमुळे काही प्रमाणात वातावरण  बदललेले आहे. दीदी सरकारमध्ये महिलाचा लैंगिक छळ? या प्रश्नामुळे महिला मतदारांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. मात्र, या मुद्यावर जनता मतदान करेल का? हे सांगता येणार नाही.

टीएमसीसोबत मुस्लीम -
प्रशांत म्हणाले, ममता बॅनर्जींचा पक्ष मुस्लीम मतदारांना चांगल्या प्रकारे आकर्षित करत आहे. त्यांनी कदाचित यामुळेच काँग्रेस आणि लेफ्ट सोबत आघाडी केली नही. एक रिपोर्टनुसार बंगालमध्ये 30 टक्क्यांहून अधिक अल्पसंख्यक आहेत. जर ही मते फुटली नाही, तर टीएमसी आणि भाजपमध्ये जबरदस्त फाइट होईल.

भाजपसोबत कोण?
बंगालमधील राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप मतुआबहूल भागात टीएमसीला कडवी टक्कर देऊ शकते. महत्वाचे म्हणजे, CAA लागू करून लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने ही व्होट बँक पक्की केली आहे. बसीरहाट, बोनगाव, कृष्णनगर, जलपाईगुडी आणि अलीपूर. या केवळ पाच जागांवरच मतुआ समाजाची लोकसंख्या 25-30% असल्याचे बोलले जाते. त्यांनी भाजपला मत दिल्यास भाजपचे व्होट शेअर मोठ्या प्रमाणावर वाढेल. बंगालमध्ये काँग्रेस आणि लेफ्टला फार आशा नाही. यामुळे प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरीही ठरू शकते. 

Web Title: lok sabha election 2024 bjp may be number one party in west bengal says prashant kishor prediction talking about TMC also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.