राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; गहलोत, पायलट, जोशी समर्थक ३२ नेते भाजपात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 03:32 PM2024-03-10T15:32:08+5:302024-03-10T15:32:35+5:30

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय असलेले माजी मंत्री आमि काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Lok Sabha Election 2024: Big blow to Congress in Rajasthan; 32 supporters of Gehlot, Pilot, Joshi join BJP | राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; गहलोत, पायलट, जोशी समर्थक ३२ नेते भाजपात दाखल

राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; गहलोत, पायलट, जोशी समर्थक ३२ नेते भाजपात दाखल

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानमध्येकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय असलेले माजी मंत्री आमि काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा,  भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

काँग्रेसच्या या आघाडीच्या नेत्यांसह त्यांच्या अनेक समर्थकांनी पक्षाची साथ सोडत कमळ हातात घेतले. राजस्थान काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीमुळे येथील समिकरणं बदलली आहे. काँग्रेसची साथ सोडून भाजपात आलेल्या नेत्यांमध्ये नागौरमधील अनेक दिग्गज जाट नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून झालेल्या पक्षांतरामुळे भाजपामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आता राजस्थानमध्ये पुन्हा एकदा २५ पैकी २५ जागा जिंकण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.

काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांमध्ये लालचंद कटारिया यांच्यासह गहलोत सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेले राजेंद्र यादव, माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, आलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा, भीलवाडाचे माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. या नेत्यांपैकी कटारिया हे अशोक गहलोत यांचे समर्थक आहेत. तर खिलाडीलाल बैरवा हे सचिन पालयट यांचे कट्टर समर्थक आहे. तसेच रामपाल शर्मा हे सी.पी. जोशी यांचे निकटवर्तीय आहेत.

भाजपामध्ये आलेल्या कांग्रेस नेत्यांमध्ये दोन माजी मंत्री आणि ४ माजी आमदारांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय माजी आमदार रामनारायण किसान, अनिल व्यास, निवृत्त आयएएस ओंकार सिंह चौधरी, गोपालरामा कुकुणा, अशोक जांगिड, प्रिया सिंह मेघवाल, सेवालदाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश चौधरी, राजेंदेर परसवाल, शैतान सिंह मेहरडा, रामनारायण झाझडा यांचा समावेश आहे.  

Web Title: Lok Sabha Election 2024: Big blow to Congress in Rajasthan; 32 supporters of Gehlot, Pilot, Joshi join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.