आई भेटायला आली, मुलगा लटकलेला आढळला; कोट्यात पाच तासांत 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:16 IST2025-01-22T18:16:33+5:302025-01-22T18:16:44+5:30
Kota Student Suicide: राजस्थानमधील कोचिंग हब कोट्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबेना.

आई भेटायला आली, मुलगा लटकलेला आढळला; कोट्यात पाच तासांत 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
Kota Student Suicide: राजस्थानच्याकोटामध्ये एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. NEET ची तयारी करणाऱ्या 24 वर्षीय विद्यार्थ्याने बुधवारी सकाळी 9 वाजता आत्महत्या केली, त्यानंतर काही तासांतच आणखी एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना समोर आली. JEE ची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थीने खोलीत गळफास घेतला. 22 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 कालावधीत होणाऱ्या JEE Mains परीक्षेला तो बसणार होता.
आई मुलाला सप्राइज द्यायली आली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय मृत विद्यार्थी आसामचा रहिवासी होता, JEE च्या तयारीसाठी कोटा येथे आला होता. आज दुपारी दोनच्या सुमारास विद्यार्थ्याची आई त्याला सप्राइज देण्यासाठी कोट्यात पोहोचली. आईने मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला असता, तिला मुलाचा गळफास घेतलाला मृतदेह दिसला. हे दृष्य पाहून ती माऊली तिथेच बेशुद्ध पडली. स्थानिकांनी दोघांनाही रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी विद्यार्थ्याला तपासून मृत घोषित केले. तर, त्याच्या आईवर उपचार सुरू आहेत.
22 दिवसांत 6 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
जानेवारीच्या अवघ्या 22 दिवसांत कोटामध्ये आत्महत्येची ही सहावी घटना आहे. यापूर्वी, 7,8,16,17 आणि 22 जानेवारी रोजी NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दबावाखाली येऊन आत्महत्या केल्या.
2023 मध्ये 29 आणि 2024 मध्ये 19 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
2024 मध्ये कोटामध्ये 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तर 2023 मध्ये एकूण 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. गंभीर परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाकडून अनेक पावले उचलण्यात आली. वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये अँटी हँगिंग उपकरणे बसवण्यात आली, त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला होता, ज्याद्वारे विद्यार्थी कोणत्याही समस्येसाठी प्रशासनाशी बोलू शकतात. या सर्व उपाययोजना करुनदेखील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत.