"नेत्यांना धमक्या, पैसा, सत्तेचा गैरवापर, प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपा..."; कमलनाथांचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 17:30 IST2024-04-01T17:28:25+5:302024-04-01T17:30:33+5:30
Lok Sabha Election 2024 And Kamalnath : कमलनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे.

"नेत्यांना धमक्या, पैसा, सत्तेचा गैरवापर, प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपा..."; कमलनाथांचं टीकास्त्र
लोकसभा निवडणुकीपूर्वी कमलनाथ यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख कमलनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. "भाजपाला या पवित्र भूमीला रणभूमी बनवायची आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"छिंदवाडाला भारतातील सर्वात विकसित क्षेत्र बनवण्यासाठी मी 45 वर्षांपासून तपश्चर्या करत आहे. छिंदवाडा ही माझ्यासाठी कर्मभूमी आणि तपोभूमी आहे. भाजपावाल्यांना या पवित्र भूमीला रणभूमी बनवायचे आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पैसा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात व्यस्त आहे. नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत."
मैं 45 वर्ष से छिंदवाड़ा को भारत का सबसे विकसित इलाका बनाने की तपस्या कर रहा हूं। छिंदवाड़ा मेरे लिए कर्मभूमि और तपोभूमि है।
— Kamal Nath (@OfficeOfKNath) April 1, 2024
भाजपा वाले इस पवित्र भूमि को रणभूमि बनाना चाहते हैं। इस चुनाव में भारतीय जनता पार्टी धनबल, बाहुबल और सत्ता बल का दुरुपयोग करने में लगी है। नेताओं को डराया…
"छिंदवाड्यातील लोक भाजपाचं हे कृत्य अतिशय काळजीपूर्वक पाहत आहेत आणि त्यांनी छिंदवाड्यावर हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपा खोटेपणा, फसवणूक आणि सौदेबाजीचा खेळ खेळते, परंतु निवडणुकीचे निकाल आल्यावर छिंदवाड्यातील जनतेने भाजपाला केलेल्या गुन्ह्याची योग्य ती शिक्षा दिल्याचं उघड होतं. छिंदवाडा आपला अनादर सहन करणार नाही आणि आपल्या विकासाच्या प्रवासात पुढे जात राहील" असं म्हणत कमलनाथ यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे.