तीन वर्षांत लॉटरी किंगच्या 'फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून द्रमुकला मिळाले ५०९ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 05:43 IST2024-03-18T05:42:11+5:302024-03-18T05:43:32+5:30
योजना २०१८ मध्ये लागू झाल्यापासून भाजपला सर्वाधिक रूपये मिळाले.

तीन वर्षांत लॉटरी किंगच्या 'फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून द्रमुकला मिळाले ५०९ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लॉटरी किंग सँटिआगो मार्टिनच्या फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेसकडून तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून २०२० ते २०२३ दरम्यान तब्बल ५०९ कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या माहितीतून उघड झाले आहे. ही माहिती निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे सीलबंद लिफाफ्यांमध्ये सादर केली होती.
आयोगाने ही माहिती आपल्या संकेतस्थळावर जाहीर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
योजना २०१८ मध्ये लागू झाल्यापासून भाजपला सर्वाधिक ६९८६.५ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यानंतर तृणमूल काँग्रेस (१,३९७ कोटी), काँग्रेस (१,३३४ कोटी) आणि भारत राष्ट्र समिती (१,३२२ कोटी) यांचा क्रमांक लागतो. तृणमूलला १,३९७ कोटी रुपये मिळाले.
कोणाला किती देणगी?
- बिजू जनता दल - ९४४.५ कोटी
- द्रमुक - ६५६.५ कोटी
- वायएसआर काँग्रेस - ४४२.८ कोटी
- जेडीएस - ८९.७५ कोटी
- टीडीपी - १८१ कोटी
- शिवसेना - ६०.४ कोटी
- आरजेडी - ५६ कोटी
- सपा - १४.०५ कोटी
- अकाली दल - ७.२६ कोटी
- एआयएडीएमके - ६.०५ कोटी
- नॅशनल कॉन्फरन्स - ५० लाख