मुलगा कर्नाटकात मंत्री, आता जावयाला लोकसभेत पाठवण्याची तयारी! मल्लिकार्जुन खर्गेच मोडणार नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:45 AM2024-03-12T10:45:39+5:302024-03-12T10:46:21+5:30

मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Boy minister in Karnataka, ready to send son-in-law to Lok Sabha now Will Mallikarjun Kharge break the rules? | मुलगा कर्नाटकात मंत्री, आता जावयाला लोकसभेत पाठवण्याची तयारी! मल्लिकार्जुन खर्गेच मोडणार नियम?

मुलगा कर्नाटकात मंत्री, आता जावयाला लोकसभेत पाठवण्याची तयारी! मल्लिकार्जुन खर्गेच मोडणार नियम?

काँग्रेस अध्यक्ष तथा I.N.D.I.A. चे चेअरपर्सन मल्लिकार्जुन खर्गे लोकसभा निवडणूक लढणार की नाही, यासंदर्भात अद्याप साशंकता आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, खर्गे 2024 ची निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. जर त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला, तर पक्ष आणि I.N.D.I.A. साठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, खर्गे यांच्या जागी गुलबर्गा येथून त्यांचे जावई राधाकृष्णन दोड्डामणी यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाऊ शकते. जर असे झाले तर, एका कुटुंबातील एकाच सदस्याला खासदारकी अथवा आमदारकीचे तिकीट देण्यासंदर्भातील पक्षाचा नियम खर्गे स्वतःच तोडतील. यावर तोडगा म्हणून, जावई हे दुसऱ्या कुटुंबातील सदस्य आहेत, असेही बोलले जाऊ शकते. खर्गे यांचा मुलगा प्रियांग खर्गे कर्नाटकातील सिद्धारामय्या सरकारमध्ये मंत्री आहेत. महत्वाचे म्हणजे, माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रियांक गांधीही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नाहीत. काँग्रेस पक्षाने 2022 मध्ये उदयपूरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात या नियमासंदर्भात बरीच चर्चा केली होती.

मल्लिकार्जुन खर्गेकर्नाटकातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 मध्ये त्यांचा येथे पराभव झाला होता. यानंतर ते राज्यसभेवर केले होते. ते सध्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचा कार्यकाळ अजून चार वर्षे बाकी आहे. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात ते रेल्वेमंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्रीही राहिले आहेत.

गेल्या आठवड्यापर्यंत गुलबर्गा मतदारसंघातून खर्गे यांचे नावही चर्चेत होते. मात्र आता खर्गे हे, कुठल्याही एका मतदारसंघापूरते मर्यादित न राहता, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संपूर्ण देशावर आपले लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. अलिकडच्या काही वर्षांत, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांनीही पक्षाध्यक्ष असताना निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र, 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी पराभव केला. तर दुसरीकडे, भाजपाध्यक्ष जेपी नड्डाही यावेळी निवडणूक लढवत नाहीत असे समजते. 2014 आणि 2019 मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला होता.

Web Title: Boy minister in Karnataka, ready to send son-in-law to Lok Sabha now Will Mallikarjun Kharge break the rules?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.