हैदराबाद की भाग्यनगर? भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत PM मोदींनी दिले मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 07:25 PM2022-07-03T19:25:42+5:302022-07-03T19:26:22+5:30

आरएसएसकडून हैदराबादचा नहमीच भाग्यनगर उल्लेख केला जातो. योगी आदित्यनाथ यांनीही यापूर्वी शहराचा भाग्यनगर उल्लेख केला आहे.

Bhagyanagar or Hyderabad? PM narendra Modi gave big hints in the meeting of BJP National Executive | हैदराबाद की भाग्यनगर? भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत PM मोदींनी दिले मोठे संकेत

हैदराबाद की भाग्यनगर? भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत PM मोदींनी दिले मोठे संकेत

googlenewsNext

हैदराबाद:हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या(BJP National Executive Meeting) दुसऱ्या दिवशी(रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाषण केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी हैदराबादचा (Hyderabad) उल्लेख भाग्यनगर (Bhagyanagar) असा केला. 'भाग्यनगरमध्येच सरदार पटेलांनी 'एक भारत' दिला होता. आम्ही तुष्टीकरण संपवून पूर्णत्वाचा मार्ग स्वीकारला आहे. आमची एकच विचारधारा आहे- नेशन फर्स्ट. आमचा एकच कार्यक्रम आहे- नेशन फर्स्ट.'

दरम्यान, भाजप नेते पीयूष गोयल यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले की, भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार का? त्यावर त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह पक्षाचे मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे सांगितले. विशेष म्हणजे, आरएसएस नेहमीच हैदराबादचा भाग्यनगर असा उल्लेख करते. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचारादरम्यान  भाग्यनगर म्हटले होते. 

नोव्हेंबर 2020 मध्ये योगी आदित्यनाथ महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी हैदराबादला आले होते, तेव्हा त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, भाजपची सत्ता आल्यावर शहराचे नाव भाग्यनगर केले जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील निवडणुकांच्या प्रचारासाठी हैदराबादला गेले होते आणि तेथे त्यांनी भाग्यनगर मंदिराला भेट देऊन दिवसाची सुरुवात केली होती. हे मंदिर 429 वर्षे जुन्या चारमिनारच्या बाजुला आहे. त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली होती.
 

Web Title: Bhagyanagar or Hyderabad? PM narendra Modi gave big hints in the meeting of BJP National Executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.