Accident in Rewari: अस्थी विसर्जनावरुन येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, महिला-मुलांसह 5 जणांचा मृत्यू; 12 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:06 AM2022-05-17T11:06:04+5:302022-05-17T11:06:12+5:30

Accident in Rewari: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थल गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Accident in Rewari: 5 died, including women and children and 12 injured in accident in Rewari | Accident in Rewari: अस्थी विसर्जनावरुन येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, महिला-मुलांसह 5 जणांचा मृत्यू; 12 जखमी

Accident in Rewari: अस्थी विसर्जनावरुन येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, महिला-मुलांसह 5 जणांचा मृत्यू; 12 जखमी

Next

रेवाडी: हरिद्वारमध्ये अस्थी विसर्जनावरुन परतत असताना एका गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण जखमी आहेत. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यात NH-48 वर ऑडी गावाजवळ हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझर गाडी मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोराने धडकली. या अपघातातील 12 जखमींना बावल येथील आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रूझर कारमध्ये 17 जण होते असे सांगण्यात येत आहे. क्रुझर कारमधील कुटुंबीय हरिद्वारला अस्थी विसर्जन केल्यानंतर जयपूरच्या सामोद गावाकडे परतत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

ट्रक चालक फरार
ही धडक इतकी जोरदार होती की, क्रूझरचा चक्काचूर झाला. भानुराम(35), महेंद्र(33), आशिष(15), सुमा देवी(35) आणि भोरी देवी(95) यांचा अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. महामार्गावरून जाणाऱ्या लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. सध्या पोलीस त्या ट्रक ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.
 

Web Title: Accident in Rewari: 5 died, including women and children and 12 injured in accident in Rewari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.