टिटोली येथे मतदारांचे पुष्प देऊन स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:16 PM2019-10-21T13:16:14+5:302019-10-21T13:16:24+5:30

Maharashtra Assembly Election 2019 घोटी : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील २८८ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू झाले आहे.

 Voters welcome with a floral wreath at Titoli | टिटोली येथे मतदारांचे पुष्प देऊन स्वागत

टिटोली येथे मतदारांचे पुष्प देऊन स्वागत

googlenewsNext

घोटी : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील २८८ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू झाले आहे. वाडीवर्हे येथील दोन मतदान केंद्र आण ित्र्यंबकेश्वर तालुक्यातील गोलदरी ह्या संवेदनशील मतदान केंद्रांवर प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. इगतपुरी तालुक्यात दोन ठिकाणी सदोष मतदान यंत्र तातडीने बदलण्यात आले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायत आण िपदाधिकार्यांनी विशेष व्यवस्था केली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवरील व्यवस्थेचा वापर करण्यात आला. टिटोली येथे सखी मतदान केंद्रात मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे.. पावसाचे वातावरण असतानाही मतदार घराबाहेर पडत असल्याचे आशादायी चित्र आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील २८८ मतदान केंद्रात सकाळी सात वाजता उत्साहात मतदानाला सुरु वात झाली. दोन ठिकाणी मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाल्याने यंत्र तातडीने बदलण्यात आले.

Web Title:  Voters welcome with a floral wreath at Titoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.