पश्चिममध्ये दोन मतदानयंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:52 IST2019-10-21T00:50:32+5:302019-10-21T00:52:13+5:30

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन ईव्हीएम यंत्रांचे वाटप करण्यात आले. कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात रवाना झाले आहेत.

Two voting machines in the West | पश्चिममध्ये दोन मतदानयंत्रे

पश्चिममध्ये दोन मतदानयंत्रे

सिडको : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन ईव्हीएम यंत्रांचे वाटप करण्यात आले. कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात रवाना झाले आहेत.
नाशिक पश्चिम मतदारसंघात ३६५ मतदान केंद्रे असून, राखीवसह ४०३ साहाय्यकारी मतदान केंद्रांची व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सोय करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी सकाळी मतदान साहित्य घेण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांनी राजे संभाजी स्टेडियम येथे टपाली मतदान केले.
नाशिक पश्चिम मतदारसंघात १९ उमेदवार व एक नोटा अशी २० संख्या होत असल्यामुळे दोन बॅलेट युनिट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ३६५ कंट्रोल युनिट, ३६५ व्हीव्ही पॅट, ३६५ ईव्हीएम, ७३० बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले. याबरोबरच ६० कंट्रोल युनिट, ७० बॅलेट युनिट, ९० व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले आहेत. राखीव युनिट हे ३८ सेक्टर अधिकाºयांमार्फत सोमवारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात येणार आहे.





त्यासाठी मत्ांपेटी ठेवण्यात आली होती. सुमारे साडेचारशेहून अधिक कर्मचारी, अधिकाºयांनी या व्यवस्थेचा लाभ घेतला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Two voting machines in the West