सिन्नरला ९२ हजारांचे दागिने चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:18 PM2019-11-21T23:18:56+5:302019-11-21T23:19:25+5:30

सिन्नर : सून व तिच्या आईला मारहाण करीत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत सासू-सासऱ्यांनी घरात कोंडून ठेवल्याची घटना सरदवाडी रस्त्यावरील हरिओम बंगल्यात घडली.

Sinnar gets stolen jewelry worth Rs | सिन्नरला ९२ हजारांचे दागिने चोरीस

सिन्नरला ९२ हजारांचे दागिने चोरीस

googlenewsNext
ठळक मुद्दे७० हजार असे ९२ हजारांचे दागिने चौघांनी काढून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : सून व तिच्या आईला मारहाण करीत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत सासू-सासऱ्यांनी घरात कोंडून ठेवल्याची घटना सरदवाडी रस्त्यावरील हरिओम बंगल्यात घडली.
सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासू-सासºयासह चौघांविरोधात ९२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सरदवाडी रस्त्यावरील हरिओम बंगल्यात फिर्यादी अर्चना चंद्रशेखर सानप (२३) ही लहान मुलगी अवनीसह राहते.
शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास सासू इंदूबाई भागूजी सानप, सासरे भागोजी वाळीबा सानप, भाची रंजित शांताराम दराडे, मामेसासरे कमलाकर दामोदर आव्हाड यांनी फिर्यादी अर्चनासह तिची आई सीता अरु ण बोडके व लहान मुलगी अवनी यांना मारहाण करून शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे व सहायक उपनिरीक्षक जी. डी. परदेशी तपास करीत आहेत.अर्चना सानप यांच्या अंगावरील १३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अंदाजे किंमत २२ हजार व सीता यांच्या अंगावरील अडीच तोळ्याची सोन्याची बांगडी व दोन तोळ्याची सोन्याची पोत अंदाजे किंमत ७० हजार असे ९२ हजारांचे दागिने चौघांनी काढून घेतले. दमदाटी करीत तिघांनाही घरात कोंडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी व आरोपी यांच्यात आपापसात बैठक होऊन समझोता करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात यश न आल्याने फिर्यादी अर्चना सानप यांनी सोमवारी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Sinnar gets stolen jewelry worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.