मालेगाव बाह्य : शिवसेना-कॉँग्रेसमध्ये चुरशीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:28 AM2019-10-12T00:28:31+5:302019-10-12T00:29:31+5:30

मालेगाव बाह्य मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीत नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होेते; मात्र शिवसेना, भाजप व राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. यंदा राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे व सेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे या दोघांमध्ये चुरशीचा सामना होणार आहे.

Outside Malegaon: | मालेगाव बाह्य : शिवसेना-कॉँग्रेसमध्ये चुरशीचा सामना

मालेगाव बाह्य : शिवसेना-कॉँग्रेसमध्ये चुरशीचा सामना

Next
ठळक मुद्देजिल्हानिर्मिती, शेती सिंचन, बेरोजगारी ठरणार कळीचा मुद्दा

मालेगाव बाह्य मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीत नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होेते; मात्र शिवसेना, भाजप व राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. यंदा राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे व सेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे या दोघांमध्ये चुरशीचा सामना होणार आहे.
मालेगाव तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळसदृश परिस्थिती होती. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळणार आहे. तालुक्यातील मतदारांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. तालुक्यात शेती सिंचनासह बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुप्रतीक्षित जिल्हानिर्मिती, मांजरपाडा-२, पश्चिम भागातील औद्योगिक वसाहतीचा विकास, पश्चिमवाहिनी नद्या पूर्ववाहिनी करणे, आरोग्य सुविधा, चंदनपुरी तीर्थक्षेत्राचा विकास आदी प्रश्न निवडणुकीच्या रणधुमाळीत गाजणार आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात तीन लाख ३९ हजार ७१ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ७८ हजार ५५४, पुरुष तर एक लाख ६० हजार ५१४ महिला मतदार आहेत. तीन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. बाह्य मतदारसंघात डॉ. तुषार शेवाळे व अभियंता असलेले दादा भुसे यांच्यात सरळ लढत होत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व काँग्रेसचे डॉ. शेवाळे या दोहोंचाही मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. शिवाय कार्यकर्त्यांचेही जाळे आहे. यंदा युती-आघाडी झाल्याने दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी बळ वाढलेले आहे. सन २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे दादा भुसे व भाजपचे पवन ठाकरे यांच्यात सरळ लढत झाली होती. दादा भुसे यांना ८२ हजार ९३ मते मिळाली होती, तर भाजपचे पवन ठाकरे यांना ४४ हजार ६७२ मते मिळाली होती. राष्टÑवादी काँग्रेसचे सुनील गायकवाड यांना ३४ हजार ११७ मते मिळाली होती. या चुरशीच्या लढतीत भुसे यांनी विजयश्री खेचून आणली होती. या वेळची निवडणूक मात्र प्रतिष्ठेची बनली आहे.
शहराच्या पूर्व व पश्चिम भागातील उभारण्यात आलेल्या औद्योगिक वसाहतीत उद्योगधंदे सुरू करून रोजगार निर्मिती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मतदारसंघातील
कळीचे मुद्दे
मालेगाव जिल्हानिर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. जिल्हा दर्जाचे शासकीय कार्यालय मालेगावी असताना जिल्हानिर्मिती रखडली आहे.
४गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी पश्चिमवाहिन्या नद्या पूर्ववाहिन्या करण्याची मागणी केली जात आहे.

माळमाथ्यावरील मतदारांची भूमिका निर्णायक
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दाभाडी विधानसभा मतदारसंघ नामशेष होऊन मालेगाव बाह्य मतदारसंघ अस्तित्वात आला. सोयगाव, नववसाहत, द्याने, म्हाळदे, संगमेश्वर, कॅम्प या शहरी भागाचाही बाह्य मतदारसंघात समावेश असल्याने शहरी व ग्रामीण जनतेचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार या मतदारसंघातून निवडून जातो.
४ तालुक्यातील काटवण भागाचा बाह्य मतदारसंघात समावेश आहे, तर माळमाथ्यावरील काही गावांतील मतदारांची भूमिका निर्णायक ठरते.
४ दाभाडी, टेहरे, सोयगाव, रावळगाव, झोडगे, करंजगव्हाण, सौंदाणे, वडनेर खाकुर्डी, अजंग-वडेल या गावांमध्ये सर्वाधिक मतदारसंख्या आहे.
बदललेली समीकरणे
मागील निवडणुकीत युती आणि आघाडी दुभंगली होती. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढविली गेली होती. त्यातून मतविभागणीचा फायदा विजयी उमेदवाराला झाल्याचे दिसून येते. आता मात्र, युती आणि आघाडी झाल्याने मतविभागणीचा धोका टळलेला आहे.
शिवसेनेचे दादा भुसे हे सलग चौथ्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीत असले तरी, यंदा त्यांच्यापुढे कॉँग्रेसच्या डॉ. तुषार शेवाळे यांनी तगडे आव्हान दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे.
दरवेळी लढतीत असलेले हिरे घराणे यावेळी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने आहे. त्यामुळे भुसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भुसे यांच्याकडून गेल्या तीन टर्ममधील विकासकामांवर आधारित मते मागितली जात असल्याने त्या तुलनेत शेवाळे यांची पाटी कोरी असल्याने लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Outside Malegaon:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.