तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 21:29 IST2026-01-15T21:10:11+5:302026-01-15T21:29:57+5:30
एक्झिट पोलने नाशिक महापालिकेची सत्ता कायम राखण्यात महायुतीकडे जाण्याचा अंदाज मांडला आहे. एक्झिट पोलनुसार शिंदेसेना सर्वाधिक जागा तर भाजपा दोन नंबरचा पक्ष होऊ शकतो.

तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
नाशिक महानगर पालिकेसाठी आज मतदान पार पडले. आता सर्वांच्या नजरा या उद्या येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. या आधी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. नाशिकमध्ये शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
साम टीव्हीचा एक्झिट पोलनुसार शिंदेसेनेला ५५ तर भाजपला ५२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ५, ठाकरेसेनेला ५, शरद पवार राष्ट्रवादीला १, मनसेला २ आणि इतरांना १ जागा मिळू शकतात.
एक्झिट पोलने नाशिक महापालिकेची सत्ता कायम राखण्यात महायुतीकडे जाण्याचा अंदाज मांडला आहे. एक्झिट पोलनुसार शिंदेसेना सर्वाधिक जागा तर भाजपा दोन नंबरचा पक्ष होऊ शकतो.
राष्ट्रवादीला ५ जागांचा अंदाज
सामच्या एक्झिट पोलने नाशिक महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त ५ जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. तर ठाकरेसेनेला ५, शरद पवार राष्ट्रवादीला १, मनसेला २ आणि इतरांना १ जागा मिळू शकतात.
दोन्ही ठाकरे बंधूंनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिककरांना आवाहन केले होते. उद्धव ठाकरे यांनीही जोरदार तयारी केली होती. पण, एक्झिट पोलमध्ये ठाकरे बंधूंना फक्त ७ जागांचा अंदाज व्यक्त केला आहे.
पुण्यात कुणाला किती जागा?
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या पुणे महापालिकेत कोण सत्तेवर बसणार, याचे उत्तर काही तासांतच मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलने निकालाचे अंदाज मांडले आहेत. दोन एक्झिट पोलने पुण्यात भाजपा पुन्हा एकदा सत्ता मिळवणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
पुणे महापालिकेच्या १६२ जागांसाठी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यातच थेट लढत होत आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा पुण्याची सत्ता मिळवण्यात यशस्वी होतील का? याकडे सगळ्याचे लक्ष आहे.
कोण किती जागा जिंकू शकते?
भाजपा - ९१
राष्ट्रवादी (अजित पवार) - ४३
शिवसेना - ७
काँग्रेस ८