मुखेड फाटा येथे दुचाकीस्वारांकडून पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:01 IST2020-12-01T21:00:40+5:302020-12-02T00:01:58+5:30

येवला : तालुक्यातील मुखेड फाटा येथे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीस्वाराकडून गावठी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त केले आहे.

Live cartridges with pistols seized from two-wheelers at Mukhed Fata | मुखेड फाटा येथे दुचाकीस्वारांकडून पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त

मुखेड फाटा येथे दुचाकीस्वारांकडून पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त

ठळक मुद्दे तालुका पोलिसात संशयीत सोनवणे, जाधव यांचे विरूध्द गुन्हा दाखल

येवला : तालुक्यातील मुखेड फाटा येथे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीस्वाराकडून गावठी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त केले आहे.

गुप्त बातमीच्या आधारे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ३०) मुखेड फाटा येथे विंचूर रोडवरील मोरया हॉटेल समोर संशयीत दुचाकीस्वार विकास वाळुबा सोनवणे (१९) रा. साई कॉर्नर,कोपरगाव तर सोमनाथ कोंडाजी जाधव (२७ ) रा. जउळके ता. येवला यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुस सह स्प्लेडंर मोटारसायकल (एमएच ४१ यू ७२१४) असा ५५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुमार सोने यांचे नेतृत्वाखालील पोलिस हवालदार नंदु काळे, पोलिस नाईक सागर काकड, पोलिस शिपाई कुणल मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी तालुका पोलिसात संशयीत सोनवणे, जाधव यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
 

Web Title: Live cartridges with pistols seized from two-wheelers at Mukhed Fata