नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:52 IST2024-11-23T16:50:38+5:302024-11-23T16:52:05+5:30

Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. संतुक हंबर्डे यांचा अवघ्या 1457 मतांनी पराभव झाला आहे.

Nanded Loksabha ByPoll: Big blow to Congress in Nanded; BJP's resounding victory in the Lok Sabha by-election | नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. मतमोजणीच्या शेवटच्या काही टप्प्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी पुनरागमन करत भाजपचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे यांचा अवघ्या 1457 मतांनी पराभव केला. दुपारी 4 वाजेपर्यंत भाजपचे उमेदवार 35 हजार मतांनी आघाडीवर होते, मात्र शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये गेम पालटला आणि अटीतटीच्या लढतीत रवींद्र चव्हाण यांनी नांदेड लोकसभेची जागा राखली. त्यांना 586788 मते मिळाली, तर भाजपच्या हंबर्डे यांना 585331 मते मिळाली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभेत प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत झाली होती. त्यात वसंत चव्हाण 59 हजार 442 मतांनी विजयी झाले होते. पण, वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसने वसंत चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपने डॉ. संतुक हंबर्डे यांना मैदानात उतरवले होते. 

दरम्यान, आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दमदार कामगिरीनंतर दिल्ली भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड लोकसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचाही उल्लेख केला. पण त्यांनी चुकून दावा केला की, नांदेडमधील विजयामुळे महाराष्ट्रात भाजपच्या लोकसभेच्या जागा 9 वरुन 10 वर आल्या आहेत.

पण, पीएम मोदींच्या भाषणानंतर काही वेळातच नांदेड पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर दिसून आला, ज्यामध्ये काँग्रेसला 1457 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण, या दोन्ही विधानसभा जागा महायुतीने जिंकल्या आहेत. शिंदे गटाच्या या विधानसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या.

Web Title: Nanded Loksabha ByPoll: Big blow to Congress in Nanded; BJP's resounding victory in the Lok Sabha by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.