'कुठे गेले ते 20 लाख कोटी रुपये?' काँग्रेसचा मोदींना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 03:32 PM2020-08-08T15:32:08+5:302020-08-08T15:55:56+5:30

पंतप्रधान मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती.

'Where did the Rs 20 lakh crore go?' Congress directly questions Narendra Modi | 'कुठे गेले ते 20 लाख कोटी रुपये?' काँग्रेसचा मोदींना थेट सवाल

'कुठे गेले ते 20 लाख कोटी रुपये?' काँग्रेसचा मोदींना थेट सवाल

Next

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मे महिन्यामध्ये २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. दरम्यान, या पॅकेजवरून आता काँग्रेस आक्रमक झाली आहे.  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 'कहां गये वो 20 लाख करोड ?' हे राज्यव्यापी आंदोलन घेणार असून यात पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख करोडच्या पॅकेजचा हिशोब मागितला जाणार आहे .

पंतप्रधान मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पहिल्या दिवशी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्या या 20 लाख करोड पॅकेजचा काही लाभ मिळाला आहे की नाही व त्यांच्या प्रतिक्रिया व्हिडीओचित्रित करणार आहेत.सोबतच पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून मागण्या समोर ठेवायला मदत करणार आहेत.दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत.

छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मध्ये सवलत मिळाली का, नोकरदारांच्या काय अडचणी आहेत,बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली ह्याचा पर्दाफाश युवक काँग्रेस करणार असून हया सर्वांच्या मागण्या व्हिडिओचित्रण करून व पंतप्रधान कार्यालयाला फोन करून व पत्र लिहून सरकारला जाब विचारणार आहे.

मोदींनी 20 लाख करोड घोषित केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्ताहर परिषदा घेऊन कोणाला काय मिळणार याचे मोठमोठे आकडे तोंडावर फेकले. आता जवळपास 3 महिने उलटलेत. पण प्रत्यक्षात मदत कुठे आहे ? जर मोदींनी जाहिर केलेली मदत खरंच मिळाली असती तर आज परिस्थिती चांगली असती.20 लाख करोड रुपयांचे काय झाले याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसने हे आंदोलन छेडले आहे असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: 'Where did the Rs 20 lakh crore go?' Congress directly questions Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.