नवरात्रोत्सवाला नुकतीच सुरूवात झाली आहे. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने नऊ रंगाच्या कपड्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह थीमचे फोटोशूट करताता. इतकेच नाही तर काही अभिनेत्री फोटोशूटच्या माध्यमातून सामाजिक संदेशही देत असतात. आज नवरात्रीचा तिसरा दिवस असून आजचा रंग पांढरा आहे. या निमित्ताने अभिनेत्री स्मिता गोंदकरने हटके फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


स्मिता गोंदकरने कपड्यांऐवजी पांढरा रंग केस आणि भुवया पांढरे करून फोटोशूट केले आहे. कानात आणि हातातील दागिनेही पांढऱ्या रंगाचे घातले आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, आजचा रंग पांढरा. देवी चंद्रघंटाची आज पूजा केली जाते. पांढरा रंग शुद्धता, प्रार्थना आणि शांतीसाठी ओळखला जातो.


नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी स्मिताने नारंगी रंग दर्शवण्यासाठी बॅकग्राउंड ऑरेंज रंग वापरला आणि मेकअपही ऑरेंज रंगाचा केला. तिच्या या फोटोलाही खूप पसंती मिळते आहे.

तर पहिल्या दिवशी तिने डोळ्याभोवती ग्रे रंगाचा स्टार बनवला होता. 

'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. 'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.तिच्या नवरात्री निमित्ताने केलेल्या फोटोशूटलाही खूप पसंती मिळते आहे.

 स्मिताचे हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार असल्याचे ती सांगते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Who were you, what happened to you ...! It is difficult to recognize a Marathi actress in this look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.