सेलिब्रेटींचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक केल्याचे बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळते. तसेच काहीसे अभिनेता स्वप्नील जोशीसोबत झाले आहे. पण थोडक्यात त्याचे अकाउंट हॅक होण्यापासून वाटले. याबद्दल खुद्द त्यानेच सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.
अभिनेता स्वप्नील जोशीचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा प्रयत्न स्वप्नीलच्या आयटी टीमच्या वेळीच लक्षात आली आणि त्यामुळे अकाउंट्स हॅक करणाऱ्याचा प्रयत्न फसला. अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
या व्हिडिओत स्वप्नील म्हणाला की, 'काल माझे अकाऊंट हॅक होते की काय असे मला वाटले. कारण, मला
इन्स्टाग्राम सपोर्ट या अकाऊंटवरून काही मेसेज आले. या अकाउंटला टीक आहे. शिवाय त्याचे फॉलोअर्सही जवळपास ७७ हजार वगैरे आहेत. त्या लोकांनी मला मी काहीतरी चुकीचा कंटेंट टाकल्याची माहिती दिली. याबद्दल मी माझ्या सोशल मीडिया टीमला सांगितले. सुरूवातीला मला काळजी वाटली. कारण जवळपास एक मिलियन फॉलोअर्सचे हे अकाउंट आता माझ्या हातून जाते की काय असा प्रश्न सतावू लागला. पण माझ्या सोशल मीडिया टीमने याबद्दल नीट माहिती घ्यायला सुरुवात केली. या अकाउंटद्वारे सतत माझ्या पासवर्डची मागणी होत होती. जवळपास दोन ते अडीच तास हा प्रकार सुरू होता. पण मी तो दिला नाही.
पुढे स्वप्नीलने आपल्या चाहत्यांना आवाहन केले की, मी माझ्या सर्व चाहत्यांना, मित्रांना सांगू इच्छितो की कृपया आपला पासवर्ड कुणालाही देऊ नका. माझे अकाउंट हॅक व्हायचा प्रयत्न होतोय हे आमच्या लक्षात आले. आम्ही याविरोधात लढलो आणि हा हॅक व्हायचा प्रयत्न हाणून पाडला आहे.'
स्वप्नील जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच त्याची वेबसीरिज समांतरचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Video: Attempt to hack Swapnil Joshi's Instagram account, he himself gave the information
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.