सैराटमधील आर्चीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लॉकडाऊनमुळे तिच्या मूळ गावी अकलूजला आहे. मात्र ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून चाहत्यांशी संवाद साधत आहे. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी रिंकु राजगुरू सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. नुकताच तिने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती मनी माऊसोबत गप्पा मारताना दिसत आहे.
रिंकू राजगुरूने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ शेअर करत लिहिले की, मी आणि मनु संभाषण. या व्हिडिओत रिंकू मनीमाऊसोबत बोलताना दिसत आहे. रिंकू बऱ्याचदा प्राण्यांसोबत फोटो शेअर करत असते.


यापूर्वी रिंकूने मांजरीसोबतचा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती चमच्याने मांजरीला काहीतरी भरविताना दिसत आहे. तिने चिमणीसोबत बोलतानाचाही व्हिडिओ शेअर केला होता.लवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे झुंड. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहे.

रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. या चित्रपटानंतर रिंकू कागर, मेकअप या मराठी चित्रपटात झळकली.

नुकतीच तिची 100 ही हिंदी वेबसीरिज हॉटस्टारवर रिलीज झाली आहे.

या सीरिजमधील रिंकूच्या कामाचं खूप कौतूक होत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Archie alias Rinku Rajguru is an animal lover, this is how he takes care of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.