Varsha Usgavkar has two sisters, both looks So beautiful like her, check out what they do? | वर्षा उसगावकर यांना आहेत दोन बहिणी, दोघीही दिसायला आहेत त्यांच्यासारख्या सुंदर, जाणून घ्या त्या काय करतात?

वर्षा उसगावकर यांना आहेत दोन बहिणी, दोघीही दिसायला आहेत त्यांच्यासारख्या सुंदर, जाणून घ्या त्या काय करतात?

मराठीसह हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणा-या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. त्यांच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात रसिकांना रस असतो. वर्षा उसगांवकर यांना दोन बहिणीही आहेत डॉ. तोषा कुराडे आणि मनीषा तारकर. डॉ तोषा कुराडे या पणजी, गोवा या ठिकाणी ‘डॉ तोषाज लॅबोरेटरी अँड मेडिकल सेंटर’ चालवतात. डॉ तोषा या आपली बहीण वर्षाप्रमाणेच दिसायला अगदी देखण्या आहेत. तर त्यांची दुसरी बहीण मनीषा तारकर या बिजनेस वूमन आहेत. गोव्यातील माईनस्केप मिनरल्स, तारकर ब्रदर्स अशा अनेक कंपन्यांचा कारभार त्या अगदी व्यवस्थित सांभाळतात.

वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षाचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ २० वर्षं झाले आहेत. अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.

'गंमत जंमत', 'खट्याळ सासू नाठाळ सून', 'सगळीकडे बोंबाबोंब', 'मज्जाच मज्जा', 'हमाल दे धमाल', 'कुठं कुठं शोधू मी तिला', 'भुताचा भाऊ', 'पसंत आहे मुलगी', 'आमच्या सारखे आम्हीच', 'शेजारी शेजारी', 'पटली रे पटली', 'घनचक्कर', 'मुंबई ते मॉरिशस', 'ऐकावं ते नवलच', 'एक होता विदूषक' असे वर्षा उसगांवकर यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varsha Usgavkar has two sisters, both looks So beautiful like her, check out what they do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.