'पळशीची पीटी' सिनेमाचे शीर्षक पोस्टर आले समोर, लवकरच होणार अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 04:57 PM2018-09-05T16:57:39+5:302018-09-05T17:02:28+5:30

रुपेरी पडद्यावर बायोपिकचा ट्रेंड चांगलाच सुपरहिट ठरला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना विशेष भावला आहे. मेरी कोम, मिल्खा ...

Upcoming Marathi Movie Palshichi PT Poster Revealed',Soon will be the Official Announcement | 'पळशीची पीटी' सिनेमाचे शीर्षक पोस्टर आले समोर, लवकरच होणार अधिकृत घोषणा

'पळशीची पीटी' सिनेमाचे शीर्षक पोस्टर आले समोर, लवकरच होणार अधिकृत घोषणा

googlenewsNext

रुपेरी पडद्यावर बायोपिकचा ट्रेंड चांगलाच सुपरहिट ठरला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना विशेष भावला आहे. मेरी कोम, मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, संजय दत्त, सनी लिओनी असे एक ना अनेक व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक रसिकांची दाद मिळवून गेले आहेत. आता मराठी सिनेमामध्ये आणखी एका बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. नुकतेच सोशल मीडियावर 'पळशीची पीटी' या आगामी सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. हे पोस्टर समोर आल्यापासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. पी. टी. उषा यांच्या जीवनावर सिनेमा आधारित असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. मात्र हा सिनेमा  पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे कोणत्याही प्रकारची माहिती सिनेमाच्या टीमकडून देण्यात आलेली नाही. 

मराठी मातीतला चित्रपट सातासमुद्रापार नेणाऱ्या साताऱ्यातील दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 'शिक्षक दिना'च्या मुहूर्तावर 'पळशीची पीटी' या आगामी मराठी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाला वेेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आले आहे. 

'पळशीची पीटी' हे नावच एक वेगळी कुतुहुलता निर्माण करणारं असल्या कारणाने प्रेक्षकवर्ग या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार हा सिनेमा नेमक्या कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार याविषयी लवकरच अधिकत घोषणा करण्यात येणार अाहे. तसेच सिनेमात कोणकोणत्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार याविषयी माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

Web Title: Upcoming Marathi Movie Palshichi PT Poster Revealed',Soon will be the Official Announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.