क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत या मराठमोळी अभिनेत्रीचं नाव चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 01:45 PM2022-01-25T13:45:37+5:302022-01-25T13:46:00+5:30

क्रिकेटर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो.

The name of this Marathi actress is being discussed with cricketer Rituraj Gaikwad | क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत या मराठमोळी अभिनेत्रीचं नाव चर्चेत

क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत या मराठमोळी अभिनेत्रीचं नाव चर्चेत

Next

क्रिकेटर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)  त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऋतुराज गायकवाड आणि मराठी अभिनेत्री सायली संजीव यांच्या अफेयर्सची बरीच चर्चा रंगली आहे. दोघांच्या सोशल मीडियावरील अॅक्टिव्हिटीवरून चर्चेला उधाण आले आहे. मात्र, याबाबत त्या दोघांनी मौन बाळगले आहे.

सायली संजीवने नाशिकच्या एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स कॉलेजमधून बीए पॉलिटिक्सची पदवी घेतली आहे. तिला कॉलेजचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिने स्वारोवस्की जेम्स, डेंटझ, क्विकर आणि बिर्ला आयकेअरसाठी मॉडेलिंग देखील केले आहे. तिने करिअरची सुरूवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली आहे. त्यानंतर, तिने राजू पार्सेकर यांच्या ‘पोलीस लाइन्स – एक पूर्ण सत्य’ या चित्रपटासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामध्ये संतोष जुवेकर मुख्य भूमिकेत होता. या व्यतिरिक्त तिने आटपाडी नाईट्स, मन फकिरा, एबी अँड सीडी आणि द स्टोरी ऑफ पैठणी, झिम्मा या चित्रपटातही काम केले.


सायली संजीवला खरी ओळख झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून मिळाली, तिची ‘गौरी’ ही व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. तिला छोट्या पडद्यावर ‘परफेक्ट पाटी’, ‘गुलमोहर’ यांसारख्या मालिकेतून खूप यश मिळाले. अलीकडेच तिने ‘शुभमंगल ऑनलाइन’ या टीव्ही मालिकेत काम केले आहे.

Web Title: The name of this Marathi actress is being discussed with cricketer Rituraj Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app