तनिषा मुखर्जीचा हा मराठमोळा लूक तुम्हालाही करेल घायाळ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 03:09 PM2020-06-05T15:09:20+5:302020-06-05T15:11:25+5:30

काजोलची बहीण असलेल्या तनिषाने शूssss या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर नील एंड निक्की, सरकार राज, वन टू थ्री, टैंगो चार्ली चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले.

Tanisha Mukharjee’s Marathi look you will like, photo getting viral | तनिषा मुखर्जीचा हा मराठमोळा लूक तुम्हालाही करेल घायाळ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

तनिषा मुखर्जीचा हा मराठमोळा लूक तुम्हालाही करेल घायाळ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

googlenewsNext

रुपेरी पडद्यावर अपयशी ठरलेल्या तनिषाकडे सध्या कोणतेही चित्रपट नाहीत. मध्यंतरी ती बिग बॉसमध्ये झळकली होती. मात्र तिच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही. असं असलं तरी तनिषाची सोशल मीडियावरही चर्चा सुरू असतेच.एरव्ही बिकीनी फोटोमुळेंमुळे सोशल मीडियावर धुमाकुळ घालणा-या तनिषाने मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर करताच सा-यांचे लक्ष वेधून घेतले. तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकदा वेस्टर्न पद्धतीची असल्याचे अनेकदा पाहायला मिळतं. मात्र तनिषाचा मराठमोळा लूक पाहून खूप सारी पसंती दिली आहे. यांत तिचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसून येत आहे. 

मराठमोळ्या पद्धतीने नेसलेली पारंपरिक मराठी साडी, गळ्यात मोठं मंगळसूत्र, दागिने, नाकात नथ, पेहरावास साजेशी अशी केशरचना या सगळ्यामुळे तनिषाचे सौंदर्य खुलून गेले आहे. 

काजोलची बहीण आणि  अभिनेता अजय देवगणची मेहुणी असलेल्या तनिषाने शूssss या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर नील एंड निक्की, सरकार राज, वन टू थ्री, टैंगो चार्ली चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले. यानंतर बिग बॉस शोमध्ये तिच्या आणि अरमान मलिकच्या कथित रिलेशनशिपच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. मात्र अरमान आपला चांगला मित्र असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तनिषाने केला होता. 

Web Title: Tanisha Mukharjee’s Marathi look you will like, photo getting viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.