takatak movie's Ye Chandrala song has break all records on Youtube | 'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, हे गाणं घरातल्यांसमोर पाहाण्याआधी दहा वेळा करा विचार

'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, हे गाणं घरातल्यांसमोर पाहाण्याआधी दहा वेळा करा विचार

ठळक मुद्देटकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर शूट करण्यात आलेलं “ये चंद्राला...’’ एक रोमँटिक साँग पाहायला मिळाले होते.

मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला खूपच कमी वेळ बोल्ड सीन पाहायला मिळतात. पण काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका चित्रपटात आतापर्यंतच्या सगळ्याच चित्रपटांना मागे टाकत अतिशय बोल्ड सीन चित्रपटात दाखवले होते. या चित्रपटातील एका गाण्याची तर चांगलीच चर्चा रंगली होती. 

‘येडयांची जत्रा’, ‘4 इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘1234’ असे मनोरंजक चित्रपट बनवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी टकाटक हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता. या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा रंगली होती.

टकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर शूट करण्यात आलेलं “ये चंद्राला...’’ एक रोमँटिक साँग पाहायला मिळाले होते. यातील चंद्राची शीतलता आणि अभिजीती-प्रणालीचा हॉट अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा ठरला होता. गीतकार जय अत्रे यांनी लिहिलेले हे गीत श्रृती राणेने गायले होते. या गाण्यातील या दोघांच्या मादक अदा प्रेक्षकांना आवडल्या होत्या. संगीतकार वरूण लिखते यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला होता. चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारं हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. या गाण्याला युट्युबला केवळ काहीच महिन्यातच १ करोड २१ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

टकाटक या चित्रपटात सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळण्यात आला होता. मराठीत अशा प्रकारच्या चित्रपटांची संख्या फार कमी असल्याने या चित्रपटाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकत बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: takatak movie's Ye Chandrala song has break all records on Youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.