प्रिया बेर्डे यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सगळ्यात जास्त लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले. त्या दोघांची जोडी त्या काळात चांगलीच गाजली होती. प्रिया यांचे माहेरचे नाव प्रिया अरुण असे होते. त्यांचे लग्न लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत झाले असून त्यांना अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुले आहेत.


काही महिन्यांपूर्वी स्वानंदीने आई प्रिया बेर्डेसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो बघून स्वानंदी ही प्रिया बेर्डे यांच्या मुलीपेक्षा मैत्रिण जास्त वाटतेय. दोघांमधलं मैत्रिचं नातं हा फोटो पाहून स्पष्ट होतेयं.


अभिनयपाठोपाठ आता त्याची बहीण स्वानंदीसुद्धा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या चित्रपटसृष्टीतील एंट्रीमुळे त्यांची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे या प्रचंड आनंदित आहेत.


स्वानंदी बेर्डे ही 'रिस्पेक्ट' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सातपैकी एका स्त्रीची भूमिका स्वानंदी हिने या चित्रपटात साकारली आहे. अभिनयपाठोपाठ आता त्याची बहीण स्वानंदीसुद्धा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय आणखीन एका चित्रपटात ती दिसणार आहे.

Web Title: swanandi berde share her photo with mother priya derde on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.