'सुख म्हणजे नक्की काय असते'मधील माईंच्या खऱ्या आयुष्यातील पती आहेत लाइमलाइटपासून दूर, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 07:00 AM2021-07-24T07:00:00+5:302021-07-24T07:00:00+5:30

सध्या वर्षा उसगांवकर 'सुख म्हणजे नक्की काय असते' मालिकेत नंदिनी शिर्केपाटील उर्फ माईंच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत.

Sukh Mhanje Nakki Kay Aste fame Mai Aka Varsha Usgaonkar husband | 'सुख म्हणजे नक्की काय असते'मधील माईंच्या खऱ्या आयुष्यातील पती आहेत लाइमलाइटपासून दूर, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

'सुख म्हणजे नक्की काय असते'मधील माईंच्या खऱ्या आयुष्यातील पती आहेत लाइमलाइटपासून दूर, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Next

९०च्या दशकात फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. त्यांनी विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या वर्षा उसगांवकरस्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असते'मध्ये नंदिनी शिर्केपाटील माईंच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप दाद मिळते आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. तर वर्षा उसगांवकर यांचे पती लाइमलाइटपासून दूर राहतात. त्यामुळे फार कमी लोकांना माहित आहे की वर्षा उसगांवकर यांच्या नवऱ्याचा सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.


वर्षा उसगांवकर यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले आहे. वर्षा यांचे पती बऱ्याच वेळेला त्यांच्यासोबत इव्हेंटमध्ये स्पॉट होतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळपास २० वर्षे झाले आहेत. अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.

मराठी इंडस्ट्रीत १९८०-१९९० या कालावधीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी दिग्गज कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि नितीन भारद्वाज यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे.

गंमत जंमत, खट्याळ सासू नाठाळ सून, सगळीकडे बोंबाबोंब, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, कुठं कुठं शोधू मी तिला, भुताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, आमच्या सारखे आम्हीच, शेजारी शेजारी, पटली रे पटली, घनचक्कर, मुंबई ते मॉरिशस, ऐकावं ते नवलच, एक होता विदूषक असे अनेक त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.

२०१९मध्ये त्यांनी एका कोंकणी चित्रपटात आणि पियानो फॉर सेल या नाटकामध्ये काम केले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sukh Mhanje Nakki Kay Aste fame Mai Aka Varsha Usgaonkar husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app