ठळक मुद्देशुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून देत सुबोधने मंजिरीला प्रपोज केले होते. त्यावर मंजिरीने मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर माझा होकार असेल असे सुबोधला सांगितले होते आणि ती खरंच त्या पुलावर आली.

सुबोधचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म ९ नोव्हेंबर १९७५ ला पुण्यात झाला. त्याने त्याचे शिक्षण पुण्यातील सिम्बोसिस कॉलेजमधून पूर्ण केले. त्याने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी एका आयटी कंपनीत सेल्समनचे काम देखील केले होते. सुबोध भावेने आज मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. 

सुबोधचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले आहेत. तुम्हाला माहीत आहे का, त्याची पत्नी मंजिरी आणि त्याची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सुबोध नाट्यसंस्कार कला अकादमी मध्ये असताना त्याची आणि मंजिरीची ओळख झाली होती. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सुबोधला अभिनय येत नसल्याने त्याला नाटकातून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तो बॅकस्टेजचे काम करत होता तर मंजिरी नाटकात काम करत होती. तिला पाहाताच क्षणी सुबोध तिच्या प्रेमात पडला होता आणि शाळेत असतानाच त्याने मंजिरीला प्रपोज केले होते. त्या दोघांची शाळा वेगळी होती. त्यामुळे सुबोध मंजिरीला पाहण्यासाठी नाक्यावर उभा राहायचा. त्यावेळी त्यांच्यात केवळ नजरानजर व्हायची. 

हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर त्याने शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून देत मंजिरीला प्रपोज केले होते. त्यावर मंजिरीने मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर माझा होकार असेल असे सुबोधला सांगितले होते आणि ती खरंच त्या पुलावर आली आणि सुबोधला उत्तर मिळाले. त्यांनी त्यांच्या प्रेमाची कल्पना कुटुंबियांना देखील दिली. पण तुम्ही शिक्षण पूर्ण करा असा सल्ला त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना दिला. त्या दोघांचे शिक्षण सुरू होते.

त्याच दरम्यान मंजिरी बारावीत असताना कॅनडाला शिफ्ट झाली. त्यावेळी केवळ पत्रांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क असायचा. कॅनडातून परतल्यावर त्या दोघांनी पुण्यात एकाच ठिकाणी नोकरी केली आणि त्यानंतर साखरपुडा केला. लग्न झाले त्यावेळी सुबोध नोकरी करत होता. पण  कामात मन रमत नसल्याने त्याने नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनयाला दिला.

Web Title: Subodh Bhave and manjiri bhave love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.