सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची उत्सुकता लागली तिच्या सहअभिनेत्रींना, दाजींसोबत फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 20:49 IST2020-09-14T20:49:26+5:302020-09-14T20:49:57+5:30
बराच काळ सोनाली कुणालसोबत दुबईत होती. मात्र आता ते दोघे मुंबईत परतले आहेत.

सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची उत्सुकता लागली तिच्या सहअभिनेत्रींना, दाजींसोबत फोटो केले शेअर
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणजेच आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी. सोनालीचा २ फेब्रुवारी रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आपल्या परिवारातील सदस्यांसोबत साखरपुडा हा सोहळा पार पडला. बराच काळ सोनाली कुणालसोबत दुबईत होती. मात्र आता ते दोघे मुंबईत परतले आहेत आणि ते दोघे सई ताम्हणकर व प्रार्थना बेहेरे यांना भेटले. त्यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सोनाली ही दुबईमध्येच होती. या काळात कुणालसोबत किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना, किंवा दुबईतील स्थानिक हॉटेलमध्ये भेट देतानाचे अनेक व्हिडीओ सोनाली सोशल मीडियावर शेअर करत होती. मात्र आता ती मुंबईत परतली असून तिच्यासोबत कुणालही इथे आला आहे.
सोनाली आणि कुणाल अभिनेत्री सई ताम्हणकरला भेटले. त्यांनी तिघांचा एकत्र फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, जेव्हा दाजी येतात घरी.
तसेच प्रार्थना बेहेरेलादेखील सोनाली आणि कुणाल भेटले. त्यांचा सेल्फी फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आणि म्हटले की अखेर आम्ही भेटलो आणि आता लग्नाची वाट पाहतोय.
कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम करतो असे समजते आहे.
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.
नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.