कधी अप्सरा तर कधी हिरकणी अशा विविध भूमिका सक्षमपणे साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे. सोनाली देखील घरात आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. मात्र नुकताच तिने विनामेकअपमधील लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या नेहमीच मेकअपमध्ये दिसणारे सेलिब्रेटी आज मस्त घरात त्यांचा क्वॉलिटी टाईम त्यांच्या कुटुंबियासोबत घालवत आहेत. अगदी त्याचप्रमाणे सोनालीदेखील आपला वेळ घालवत आहे. अशातच तिने तिचा नो मेअकप लूक शेअर करताच चाहत्यांनीची भरभरून कमेंटस आणि लाईक्स देत तिच्या या फोटोला तुफान पसंती दिली आहे.

विनामेकअपही सोनालीचे सौंदर्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात. अगदी त्याचप्रमाणे तिच्या या नोमेकअप लूकची स्तुतीच केली आहे.


सोनाली कुलकर्णीने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.शेवटची ती हिरकणी या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं सगळीकडून खूप कौतूक झालं.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonali Kulkarni looks stunning even without makeup look, see her photos TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.