कोणी मराठी मुलगा भेटला नाय काय म्हणणार्‍या युजरला सोनाली कुलकर्णीने चांगलेच पाडले तोंडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 07:01 PM2021-06-12T19:01:34+5:302021-06-12T19:04:38+5:30

लग्नाला महिना झाल्यानंतर सोनाली कुलकर्णीने पती कुणाल कुणाल बेनोडेकरसह एक फोटो शेअर केला होता. या फोटोलाही तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती दिली.

Sonalee Kulkarni's cool response to user regarding Marriage with Marathi boy | कोणी मराठी मुलगा भेटला नाय काय म्हणणार्‍या युजरला सोनाली कुलकर्णीने चांगलेच पाडले तोंडावर

कोणी मराठी मुलगा भेटला नाय काय म्हणणार्‍या युजरला सोनाली कुलकर्णीने चांगलेच पाडले तोंडावर

Next

सोशल मीडियावर सेलिब्रेटींना ट्रोल करण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. यात मराठी कलाकरांनी देखील ट्रोल करणा-यांना वेळीच उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनालीच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.  विशेष म्हणजे लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत सगळ्याच गोष्टी तिने चाहत्यांसह शेअर केल्या. लग्नाचे फोटोही तिने चाहत्यांसह शेअर केल्यानंतर चाहत्यांनीदेखील पुढील आयुष्यासाठी तिला शुभेच्छांचा वर्षाव केला होता. 

लग्नाला महिना झाल्यानंतर सोनाली कुलकर्णीने पती कुणाल कुणाल बेनोडेकरसह एक फोटो शेअर केला होता. या फोटोलाही तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती दिली. तर काही युजरनी तिला या फोटोवरुन ट्रोल करायला सुरुवात केली. युजरने तिच्या या फोटोवर कमेंट करत विचारले की, मराठी एखादा भेटला नाय काय लग्न करायला.

 

यावर सोनालीनेही युजरच्या प्रश्नाचे वेळीच उत्तर देत इतरांचीही देखील बोलती बंद केली. यावर सोनालीने म्हटले की, कुणाल मराठी असल्याचे तिने सांगितले. सोनालीला ट्रोल करायला गेलेला युजरने सोशल मीडियावर स्वतःचे हसू करून घेतले.युजरला इतर नेटीझन्सने असल्या फालतु चौकशा करायच्या कशाला त्यालाच सल्ले देताना दिसले.


सोनाली कुलकर्णी पती कुणालसह देते फिटनेस गोल, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव

सोनालीदेखील फिटनेस फ्रिक असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. सोनाली नित्यनियमाने योगा करते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिचे वर्कआऊट योगा करतानाचे फोटो पाहायला मिळतात. सोनालीने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओत सोनालीसह कुणाललाही वर्कआऊटची आवड असल्याचे समोर आले आहे. दोघेही एकत्र घरच्या घरी वर्कआऊट करत असल्याचा हा व्हिडीओ आहे.

इतरांनीही फिट राहावे यासाठी स्वतःचे योगा करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तुर्तास सोनालीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही वर्कआऊट करण्याची प्रेरणा मिळणार हे मात्र नक्की.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonalee Kulkarni's cool response to user regarding Marriage with Marathi boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app