सोनाली कुलकर्णी पती कुणालसह देते फिटनेस गोल, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:42 PM2021-06-09T18:42:33+5:302021-06-09T18:46:17+5:30

सोनालीने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओत सोनालीसह कुणाललाही वर्कआऊटची आवड असल्याचे समोर आले आहे.

Sonalee kulkarni Give Fitness Goal With Husband kunal benodekar See Video | सोनाली कुलकर्णी पती कुणालसह देते फिटनेस गोल, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव

सोनाली कुलकर्णी पती कुणालसह देते फिटनेस गोल, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव

googlenewsNext

लग्नानंतर पती कुणाल बेनोडेकरसह सोनाली कुलकर्णी दुबईमध्ये क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर न्युली वेड कपलच्या विविध अदाज पाहायला मिळतात. सोनाली आणि कुणाल फक्त कपल गोलच देत नाही तर फिटनेस गोलही देत असल्याचे पाहायला मिळतंय नुकतेच सोनालीने चाहत्यांसह एक खास व्हि़डीओ शेअर केला आहे.    

सोनालीदेखील फिटनेस फ्रिक असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. सोनाली नित्यनियमाने योगा करते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिचे वर्कआऊट योगा करतानाचे फोटो पाहायला मिळतात. सोनालीने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओत सोनालीसह कुणाललाही वर्कआऊटची आवड असल्याचे समोर आले आहे. दोघेही एकत्र घरच्या घरी वर्कआऊट करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. 

सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकरसह फिटनेवरही खास लक्ष केंद्रित करत आहे. सोनालीची फिटनेसबाबत असलेली ही सजगता आणि नियमित वर्कआऊट करणे यामुळे सोनाली फिट आणि आरोग्यदायी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. इतरांनीही  फिट राहावे यासाठी स्वतःचे योगा करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तुर्तास  सोनालीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही वर्कआऊट करण्याची प्रेरणा मिळणार हे मात्र नक्की. 


गेल्याच वर्षी लॉकडाऊनमध्ये सोनालीने साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. तेव्हा पासून सोनाली लग्न कधी करणार याकडेच चाहत्यांचे लक्ष लागले होते. मात्र लॉकडाऊनमुळे सोनालीला हवे तसे लग्न करता आले नाही. अखेर दुस-या लॉकडाऊनमध्ये दुबईतच तिने साध्या पद्धतीने लग्न उरकल्याचे जाहिर केले. सोनालीच्या लग्नाची बातमी समोर येताच चाहत्यांनाही मोठा आश्चर्याचा धक्काच बसला होता.

कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता सोनाली आणि कुणालने लग्नात फारसा खर्च न करण्याचा निर्णय घेतला होता. जुलै महिन्यात लग्न करण्याचं जवळपास सर्वकाही ठरलंही होतं. पण मग साधेपणानेच लग्न करायचं असेल तर दोन महिने का थांबा असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी जुलैऐवजी मे महिन्यातच लग्न सुखी संसाराला सुरुवात केली.

 

Web Title: Sonalee kulkarni Give Fitness Goal With Husband kunal benodekar See Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.