'कुणी म्हणतंय ऋतुराजची राणी तर कुणी गायकवाड वहिनी..', सायली संजीवच्या साडीतील अदांवर घायाळ झाले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:29 PM2021-10-19T17:29:26+5:302021-10-19T17:30:12+5:30

बऱ्याच दिवसांपासून सायली संजीवचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे.

'Some say Rituraj's queen, some say Gaikwad's daughter-in-law ..', fans commented on Saylee Sanjeev's video | 'कुणी म्हणतंय ऋतुराजची राणी तर कुणी गायकवाड वहिनी..', सायली संजीवच्या साडीतील अदांवर घायाळ झाले चाहते

'कुणी म्हणतंय ऋतुराजची राणी तर कुणी गायकवाड वहिनी..', सायली संजीवच्या साडीतील अदांवर घायाळ झाले चाहते

Next

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सध्या खूप चर्चेत येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या काही महिनांपासून तिचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे. सायली (Sayali Sanjeev) च्या इंस्टाग्रामवरील फोटोवर ऋतुराजने कमेंट केल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. तेव्हापासून सायलीच्या कोणत्याही पोस्टवर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) शी संबधीत कमेंट केली जात आहे. दरम्यान सायली संजीवने इंस्टाग्रामवर नुकतेच साडीतील व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

सायली संजीवने नुकताच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर साडीतील व्हिडीओ शेअर केला आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की साडी खूप आवडते. या व्हिडीओत सायली ब्लू रंगाच्या साडीत दिसते आहे. त्यावर तिने स्लीव्हलेज ब्लाउज परिधान केला आहे. 


या व्हिडीओवर एका युजरने म्हटले की, ऋतुराज की रानी, तर दुसऱ्या एका युजरने गायकवाड वहिनी अशी कमेंट केली आहे. आणखी एका युजरने ऋतु का राज असे लिहिले आहे. एका युजरने लिहिले की, ऋतुराज लव्ह सायली.  तर इतर लोकांनी सुंदर, ग्लॅमरस, सेक्सी अशा कमेंट्स केल्या आहेत. 

असे आले चर्चेला उधाण...
सायली संजीवने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटो शेअर केल्यानंतर दोघांच्या रिलेशनीपबद्दल चर्चा सुरू झाली. सायलीच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला. मात्र यातील सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले ते क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्या कमेंटने. ऋतुराजने सायलीच्या फोटोवर "वोह" अशी कमेंट केली आहे. त्यामुळे सायली आणि ऋतुराज या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले. सायलीसोबतच्या अफेयरच्या चर्चेने जोर पकडताच ऋतुराजने इन्स्टाग्रामवरुन स्पष्टीकरण दिले होते. 'माझी विकेट फक्त बॉलर घेऊ शकतो. ते देखील क्लीन बोल्ड. बाकी कुणी नाही.' असं ऋतुराजने म्हटले होते. 

Web Title: 'Some say Rituraj's queen, some say Gaikwad's daughter-in-law ..', fans commented on Saylee Sanjeev's video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app