मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आशुतोषने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

टीव्ही 9 मराठीच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळे मयुरी देशमुखच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र, तरीही आशुतोषने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला, असा प्रश्न मयुरीच्या चाहत्यांना पडला आहे.

मयुरी देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती खुलता कळी खुलेना या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली. तसेच मयुरी लिखित व दिग्दर्शित नाटक ‘डिअर आजो’ला खूप लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते. याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस या चित्रपटात तिने काम केले आहे.

आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे. आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Actress Mayuri Deshmukh's husband commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.