सध्या मराठीसिनेइंडस्ट्रीत लग्नाचा धुमधडाका सुरु आहे. एकामागोमाग अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकतायेत. नेहा पेंडसेनंतर अनेक अभिनेत्रींनी लग्न केले आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. ते आहे सायली देवधरच.सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 


गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सायलीचा नवरा संगीतकार आणि गायक गौरव बुरसेशी साखरपुडा केला होता. अभिनेत्री प्राजक्ता माळीने सायलीच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्राजक्ताने फोटो शेअर करताना बॅचलर ग्रुपमधून आणखी एक बुरूज ढासळला... असे कॅप्शन दिले आहे. सायलीने लग्नात लाल रंगाची साडी परिधान केली आहे. ज्यात ती खूच सुंदर दिसतेय. प्राजक्ताने शेअर केलेल्या याफोटोवर सायलीवर शुभेच्छांच्या वर्षाव होतेय. 


सायलीने पुण्यातील अभिनव कला केंद्र या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यातील एका  ग्रुपसोबत नाटक केले आहे. सायली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Web Title: Sayali deodhar tie a knot with gaurav burse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.