'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'वायरलवाली लव्ह स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 12:29 PM2021-12-03T12:29:15+5:302021-12-03T12:29:36+5:30

गायक रोहित राऊत आता वायरलवाली लव्ह स्टोरी घेऊन येत आहे.

'Saregampa Little Champ' fame Rohit Raut's 'Viralwali Love Story' | 'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'वायरलवाली लव्ह स्टोरी'

'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'वायरलवाली लव्ह स्टोरी'

googlenewsNext

हृदयात वाजे समथिंग, हे नाते कोणते अशी सुपरहिट गाणी गायलेला गायक रोहित राऊत आता वायरलवाली लव्ह स्टोरी घेऊन येत आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर वायरलवाली लव्ह स्टोरी हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे.

सप्तसूर म्युझिक आणि नवसत्य एण्टरटेन्मेंट यांनी वायरलवाली लव्ह स्टोरी हा म्युझिक व्हिडिओ प्रस्तुत केला आहे. रोहित राऊतसह सोनाली सोनावणेने या म्युझिक व्हिडिओतले "वायरलवाली लव्ह स्टोरी" हे धमाकेदार गीत गायले आहे. सप्तसूर म्युझिकचे "जोडी  दोघांची दिसते चिकणी" हे सोनाली सोनावणेचे गाणेही हिट आहे. "वायरलवाली लव्ह स्टोरी" म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन नवनाथ निकम यांनी केले आहे. शालू देवतळे थूल यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. स्वप्नील अर्पेल यांनी छायांकन केले आहे. तर निधी साळवे आणि आदी मांडवकर ही नवी जोडी या म्युझिक व्हिडिओत झळकली आहे.

रोहित राऊतने आजपर्यंत अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्याचे प्रत्येक गाणे त्याच्या चाहत्यांना आनंद देणारे आहे. त्यात आता वायरलवाली लव्ह स्टोरी या नव्या गाण्याचीही भर पडणार आहे. तुझी माझी लव्हस्टोरी सुरू झाली, एक नंबर वायरल झाली असे आजच्या यूथच्या तोंडी असलेले शब्दच या गाण्यातून ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे रोहितची वायरलवाली लव्ह स्टोरी त्याच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरणार यात शंका नाही.

Web Title: 'Saregampa Little Champ' fame Rohit Raut's 'Viralwali Love Story'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.