तरुणांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या 'या' गोष्टीविषयी रिंकू राजगुरूला माहीतच नाही, तिनेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 06:20 PM2020-01-30T18:20:55+5:302020-01-30T18:25:41+5:30

रिंकूला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

sairat fame Rinku Rajguru doesn't know meaning of nightlife | तरुणांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या 'या' गोष्टीविषयी रिंकू राजगुरूला माहीतच नाही, तिनेच दिली कबुली

तरुणांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या 'या' गोष्टीविषयी रिंकू राजगुरूला माहीतच नाही, तिनेच दिली कबुली

googlenewsNext
ठळक मुद्देनाईट लाईफ म्हणजे काय असते हेच रिंकूला माहीत नसल्याचे तिच्या उत्तरातून स्पष्ट झाले.

अभिनेत्री रिंकू राजगुरू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट मेकअप. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रिंकूचे फॅन्स तर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन ती करत आहे. याच प्रमोशनदरम्यान तिला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला...

27 जानेवारीपासून मुंबईतील काही भागात नाईट लाईफ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे काहींनी स्वागत केले आहे तर काहींनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. याच निर्णयाबाबत नुकतेच रिंकू राजगुरूला विचारण्यात आले. पण यावर तिने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले. कारण नाईट लाईफ म्हणजे काय असते हेच रिंकूला माहीत नसल्याचे तिच्या या उत्तरातून स्पष्ट झाले.

राज्य सरकारने नाईट लाईफ सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुला काय वाटते असे रिंकूला नुकतेच एका पत्रकाराने विचारले. त्यावर तिने क्षणाचाही विलंब न करता हे नाईट लाईफ म्हणजे काय असते असा प्रतिप्रश्न त्या पत्रकाराला विचारला...

रिंकूचे हे उत्तर ऐकून काय उत्तर द्यायचे हा प्रश्न नक्कीच उपस्थितांना पडला. रिंकू एका छोट्याशा गावातून आली असल्याने तिला नाईट लाईफ म्हणजे काय असते हेच माहीत नसल्याचे तिच्या उत्तरातून सगळ्यांना कळले. 

सैराट या चित्रपटामुळे रिंकूला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले.

मेकअप या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्यासोबतच प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: sairat fame Rinku Rajguru doesn't know meaning of nightlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.