ठळक मुद्देहा व्हिडिओ सेट वेटच्या जाहिरातीचा असून या जाहिरातीच्या निमित्ताने रणवीर सिंगसोबत आकाशला काम करण्याची संधी मिळाली आहे. ही जाहिरात त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणारा आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारा परशा अर्थात आकाश ठोसर एका रात्रीत स्टार झाला. ‘सैराट’ मध्ये परशा प्रचंड भाव खाऊन गेला. त्याचे डायलॉग, त्याचे आर्चीवरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील परशा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनला. या सिनेमाने परशा अर्थात आकाश ठोसरच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आता परशा म्हणजेच आकाशला चक्क रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. त्यानेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

आकाश ठोसरने नुकताच इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सेट वेटच्या जाहिरातीचा असून या जाहिरातीच्या निमित्ताने रणवीर सिंगसोबत आकाशला काम करण्याची संधी मिळाली आहे. ही जाहिरात त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

आकाशने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. यात त्याचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. सैराट’ मधील परशा आणि हा परशा यातला बदल थक्क करणारा होता. डोक्यावर हॅट, गळ्यात मफलर अशा कूल लुकमध्ये आकाशचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

‘सैराट चित्रपटानंतर आकाश ‘एफयू: फ्रेंडशीप अनलिमिटेड’ चित्रपटात झळकला. या चित्रपटाला ‘सैराट’ इतके यश मिळू शकले नाही. पण चित्रपटातील आकाशचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. ‘एफयू: फ्रेंडशीप अनलिमिटेड’ नंतर नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरिज’ या वेबसीरिजमध्ये त्याने काम केले.

लवकरच तो नागराज मंजुळे यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे. नागराज यांच्या ‘झुंड’ या सिनेमात तो दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sairat fame akash thosar in set wet advertisement with ranveer singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.