'त्या'च्या प्रेमाची मेहंदी हातावर सजली, साजश्रृंगारात सई नटली, फोटोने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 12:02 PM2020-10-01T12:02:21+5:302020-10-01T12:03:44+5:30

अभिनेत्री सई लोकुर 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली. सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती.

Sai Lokur looks absoluetly stunning In Her New Mehandi Photo | 'त्या'च्या प्रेमाची मेहंदी हातावर सजली, साजश्रृंगारात सई नटली, फोटोने वेधले लक्ष

'त्या'च्या प्रेमाची मेहंदी हातावर सजली, साजश्रृंगारात सई नटली, फोटोने वेधले लक्ष

googlenewsNext

सई लोकुर सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांचा मनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था आता सईचीही झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सईने चाहत्यांसह फोटोशेअर करत तिचे लग्न ठरल्याची बातमी दिली होती. फोटो पाहताच चाहत्यांनीही लाईक्स कमेंटस करत तिला शुभेच्छा दिल्या. सईने शेअर केलेला फोटो हा पाठमोरा फोटो होता. त्यामुळे सईचा होणारा नवरा कोण? असाही तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. तो कोण आहे, तो काय करतो या सगळ्या गोष्टी गुलदस्त्याच असून लवकरच दोघांचा साखरपुडा होणार असल्याचेही माहिती मिळते. 

सईने पुन्हा एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या हातावर मेहंदी काढल्याचे पाहायला मिळते. सईच्या हातावर काढलेल्या मेंहदीच्या फोटोनेही लक्ष वेधून घेतले आहे. सईचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे खूप उत्सुकही आहे. चेहऱ्यावर तिचा आनंद ओसंडून वाहतोय. सईचा लवकरच  साखरपुडा होणार असून सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.

अभिनेत्री सई लोकुर 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली. सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत होते.

Also Read: 'बिग बॉस' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, फोटो शेअर करत केला खुलासा

Web Title: Sai Lokur looks absoluetly stunning In Her New Mehandi Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.