Sai Lokur is eagerly waiting for her future husband, she will get engaged soon | येणार साजण माझा...!, सई लोकूर आतुरतेने वाट पाहतेय भावी पतीची, लवकरच अडकणार लग्नबेडीत

येणार साजण माझा...!, सई लोकूर आतुरतेने वाट पाहतेय भावी पतीची, लवकरच अडकणार लग्नबेडीत

बिग बॉस मराठी शोमधून अभिनेत्री सई लोकूर घराघरात पोहचली. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच सईचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तसेच आता तिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती कुणाची तरी वाट पाहत असल्याचे तिने म्हटले आहे. 


सई लोकूरने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, कुणाच्या तरी येण्याची वाट पाहतेय. असे म्हणत तिने तिचा भावी पती तीर्थदीप रॉयला टॅग केले आहे. या व्हिडीओत सईने निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला असून यात ती गोल गोल फिरते आहे. यावेळी ती खूप आनंदी दिसते आहे. 


सई लोकूरने काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची डिजिटल लग्न पत्रिका इंस्टाग्रामवर शेअर केली होती. यात तिने संपूर्ण सोहळ्याची रुपरेषा सांगितली आहे. २७ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता देवकार्य, २८ नोव्हेंबरला संध्याकाळी ६.३० वाजता मेहंदी, २९ नोव्हेंबरला ११ वाजता हळद आणि संध्याकाळी ६.३० वाजता सीमंत पूजन आणि संगीत  ३० नोव्हेंबरला सकाळी लग्न पार पडणार आहे.


अभिनेत्री सई लोकुर 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली. सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत होते.

२०१५ साली तिने किस किसको प्यार करूँ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कपिल शर्मा, सिमरन कौर मुंडी व एली अवराम मुख्य भूमिकेत होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sai Lokur is eagerly waiting for her future husband, she will get engaged soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.