सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांच्यासाठी १७ ऑगस्ट हा दिवस खूप खास आहे. कारण एकाच दिवशी त्या दोघांचा वाढदिवस असतो. जेव्हा सचिन पिळगांवकर २७ वर्षांचे होते १६ वर्षांच्या सुप्रिया यांच्यावर प्रेम जडलं आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्या दोघांच्या लग्नाली आता ३० वर्षांहून जास्त वर्षे झाले आहेत. त्या दोघांनी टेलिव्हिजनपासून रुपेरी पडद्यावर आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यांची मुलगी श्रेया पिळगांवकरने देखील हिंदी व मराठी चित्रपटात पदार्पण केलं आहे.

तुम्हाला माहित आहे का सचिन आणि सुप्रिया यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं नाव करिश्मा मक्खनी आहे.

काही वर्षांपूर्वी एक वृत्त आलं होतं की सचिन आणि सुप्रियाने करिश्माचे वडील कुलदीप मक्थनीवर आरोप लावले आहेत की ते जबरदस्ती करिश्माला त्यांच्याकडे घेऊन गेले आहेत. मात्र या गोष्टीला घेऊन करिश्माने प्रसारमाध्यमांसमोर एक वेगळंच चित्र सादर केलं.


तिने सांगितलं की, खूप लहान असताना तिला दत्तक घेतलं होतं. मात्र तेव्हा ती खरे वडील कुलदीप मक्खनींना देखील ओळखत होती. कुलदीप मक्खनीने तिला जबरदस्ती सचिन यांच्या घरून नेलं नव्हतं. तर सचिन यांनी तिला त्यांचं घर सोडायला सांगितलं होतं. इतकंच नाही तर तिला स्वतःची ओळख व नाव देण्यासही नकार दिला होता.


करिश्माने एक धक्कादायक खुलासादेखील केला होता की, त्यावेळी तिच्या खऱ्या वडिलांना काही गुंड्यांकडून धमकीदेखील मिळाली होती. त्यावेळी सचिन यांना वाटलं की करिश्माने त्यांच्यासोबत राहिलं नाही पाहिजे.तेव्हा करिश्माने तिच्या वडिलांसोबत युकेला जायचा निर्णय घेतला.


आता करिश्मा मक्खनी कुठे आहे व काय करतेय, याबद्दल कुणालाच माहित नाही. 

Web Title: Sachin Supriya Pilgaonkar birthday unknown facts adopted daughter controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.