सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सचिन पिळगावकर. मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनयासह दिग्दर्शन, निर्मिती, गायन, नृत्य यातही सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर यांनी गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. सचिन यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. आता या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेक श्रिया पिळगावकरसुद्धा अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 

बाप लेकीचं नातं घट्ट आणि तितकंच प्रेमळ असतं हे साऱ्यांनाच माहिती आहे. सचिन आणि श्रिया यांचंही नातं आणि प्रेम याला अपवाद नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा लॉकडाउनच्या काळात आला आहे. शूटिंग आणि सिनेइंडस्ट्रीतील सगळी कामं बंद असल्यामुळे सचिन पिळगावकर व कुटुंब सध्या घरातच आहेत. त्यामुळे ते एकमेकांसोबत वेळ व्यतित करत आहेत. नुकताच सचिन पिळगावकर व श्रियाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ते दोघे हाल कैसा है जनाब का हे गाणं गाताना दिसत आहेत. हे गाणं ते दोघं श्रियाच्या बालपणापासून गात असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

या व्हिडिओतून त्या दोघांचे ट्युनिंग पहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

श्रिया पिळगावकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने एकुलती एक या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने शाहरूख खानसोबत फॅन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर भांगरा पा ले या चित्रपटातही ती नुकतीच झळकली आहे.

याशिवाय तिने मिर्झापूर, हाउस अरेस्ट यासारख्या वेबसीरिजमध्येदेखील पहायला मिळाली. तसेच आगामी हाथी मेरे साथी चित्रपटात ती राणा दुग्गाबत्तीसोबत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sachin Pilgaonkar and Shriya sung song and share video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.