Rocky movie release on 8th march | दमदार अ‍ॅक्शनपॅट ‘रॉकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दमदार अ‍ॅक्शनपॅट ‘रॉकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ठळक मुद्देसंदीप साळवे - अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

मराठी चित्रपट आशय विषयांनी समृद्ध होत असताना अॅक्शन साठी मात्र मराठी प्रेक्षकांचा कल अनेकदा हिंदी चित्रपटांकडे असतो. पण... आता मराठी चित्रपटाच्या आशयाला अॅक्शनचा जबरदस्त तडका  देणारा 'रॉकी' चित्रपट येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शनच्या पार्श्वभूमीवर खुलत जाणारी एक अलवार प्रेमकथा 'रॉकी' या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. 'रॉकी'  चित्रपटाची प्रस्तुती  पेपरडॉल एन्टरटेन्मेंटची असून निर्मिती ड्रीम् विव्हर आणि सेव्हन सीज् प्रोडक्शन्सची आहे.

‘सिक्सपॅक’ डॅशिंग हिरो, बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना हिंदी सिनेमांमधून आपण अनेकदा पहिले आहे. हिंदी सिनेमांमधली हीच अॅक्शन, दमदार डायलॉग या सगळ्या गोष्टी 'रॉकी' या मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहेत. अॅक्शनच्या जोडीला इमोशन आणि रोमान्सच्या साथीने खुलत जाणारा कथेतला ड्रामा असं एक सुपर पॅकेज असलेला ‘रॉकी’ येत्या ८ मार्च ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  

 

या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. अॅक्शन, इमोशन आणि रोमान्सने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, शशिकांत कारेकर, दीप्ती भागवत, या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते राहुल देव यांनी एका जोरदार भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘रॉकी’ सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्यांनी मराठीत काम केले आहे. 

या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू आशर असून दिग्दर्शन अदनान ए. शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान ए. शेख यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान ए. शेख यांची आहे. छायांकन फारुख खान यांनी केले आहे. राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत गीतांना लाभले आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. सुनिता त्रिपाठी या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rocky movie release on 8th march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.