सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकू राजगुरूने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


रिंकू राजगुरू हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत लिहिले की, कॅज्युअली. या फोटोत रिंकूने लाल रंगाचे टीशर्ट आणि ब्लू डेनिम घातली आहे. तसेच तिने गॉगलही घातला आहे. या लूकमध्ये रिंकू राजगुरू डॅशिंग अंदाजात दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिच्या या फोटोवर फायरची इमोजी चाहते टाकत आहेत. 


रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रिंकू राजगुरू सध्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित या प्रोजेक्टमध्ये रिंकूसोबत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर दिसणार आहेत. तिच्या या प्रोजेक्टच्या शीर्षक आणि कथानकाबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. मात्र शूटिंगच्या सेटवरून हा कोर्ट रुम ड्रामा असेल.

या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.


नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rinku Rajguru's dashing look caught fire on social media, the photo went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.