पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 02:23 PM2021-07-20T14:23:41+5:302021-07-20T14:31:31+5:30

1988 साली रमाकांत कवठेकर यांनी ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट दिग्दर्शिक केला होता. 'पंढरीची वारी' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नंदिनी जोगनेही रसिकांची प्रचंड पसंती मिळवली होती.

Remember Pandharichi Vari Movie Actress Nandini Jog Unknow Facts | पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं...

पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं...

Next

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.आषाढ महिन्याची सुरुवात झाली की,सगळ्यांनाच पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात. 
आषाढी एकादशीच्या निमित्त टीव्हीवर 'पंढरीची वारी' हा चित्रपट आवर्जुन बघायला मिळतो. चित्रपटाच्या माध्यमातून का होईना घर बसल्या रसिकही विठुरायाच्या भक्ती तल्लीन होतात. वारीची अनुभूती देणारा हा चित्रपट आवडीने रसिक पाहायचे.

 

चित्रपटातल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांना भावल्या. चित्रपटात दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, जयश्री गडकर आणि अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. या कलाकारांसोबत बाल कलाकार बकुळ कवठेकरने साकारलेला विठोबाला रसिकांची विशेष पसंती मिळाली होती. विठोबा साकारताना एकही संवाद नव्हता केवळ चेह-यावरील हावभाव देत बालकलाकारने साकारलेली भूमिका तितकीच रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरली होती. याचबरोबर नंदिनी जोग यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती.''धरिला पंढरीचा चोर'' हे गाणंही प्रचंड हिट ठरलं होतं. बकुळ कवठेकर आणि नंदिनी जोग यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. आजही भूमिका रसिकांच्या चांगलीच लक्षात आहे. चित्रपटाला इतकी वर्ष झाली तरी रसिक मात्र आजही तितक्याच भक्तीभावाने हा चित्रपट पाहतात. 1988 साली रमाकांत कवठेकर यांनी ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट दिग्दर्शिक केला होता.

या चित्रपटाव्यतिरक्त नंदिनी आणखी काही चित्रपटात झळकल्या आहेत. 'कळत नकळत', 'वाजवू का', 'थांब थांब जाऊ नको लांब', 'दे धडक बेधकडक' अशा चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.नंदिनी जोग सध्या कुठे आहेत? काय करतात ? असे प्रश्न तुम्हालाही पडले असणारच. नंदिनी जोग मुळच्या अकोल्याच्या, लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. अभिजीत जोग यांच्याशी त्यांनी लग्न करत संसार थाटला. पूर्वीप्रमाणे नंदिनी आजही तितक्याच सुंदर दिसतात. काळानुसार त्यांच्या लूकमध्येही बदल झाला असला तरी सौंदर्य आजही अबाधित आहे. सोशल मीडियावर नंदिनी जोग यांचे काही फोटोही पाहायला मिळतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Remember Pandharichi Vari Movie Actress Nandini Jog Unknow Facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app