हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता वैभव तत्ववादी त्याच्या चित्रपट व भूमिकेमुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोतून तो कोणत्या तरी चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचं समजतं आहे.

अभिनेता वैभव तत्ववादीने त्याचा फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना सांगितलं की, मी खूप उत्सुक आहे. नवीन सिनेमा, नवीन प्रोजेक्ट.

त्यानंतर वैभवने आणखीन फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे की, मॉर्निंग शूट. चित्रपटाचे शूट. 

वैभव कोणत्या चित्रपटाचे शूटिंग करतोय हे अद्याप समजलेलं नाही. त्याचे चाहते या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 

वैभव मराठी चित्रपट ‘पाँडिचेरी’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो सईसोबत दिसणार आहे. या सिनेमात सई व वैभव तत्त्ववादीसोबत अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी दिसणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.

वैभव तत्ववादीने कॉफी आणि बरंच काही, व्हॉट्सअप लग्न यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवले आहे. बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदी चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. आता वैभव विद्या बालनसोबत काम करणार आहे.

प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्यानेच स्वतः या चित्रपटात तो काम करणार असल्याचे दिव्यमराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की, या चित्रपटाला नुकतीच सुरुवात झाल्याने सध्या मी या चित्रपटाविषयी अधिक काहीही माहिती देऊ शकत नाही.


Web Title: this reason Vaibhav Tatvavadi is Super Excited !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.