‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ताला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मागितलं खास 'रिटर्न गिफ्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 02:02 PM2021-06-10T14:02:27+5:302021-06-10T14:14:21+5:30

रात्रीस खेळ चाले या सुपरहिट मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुहास शिरसाट हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो.

ratris khel chale datta naik aks suhas shirsat birthday special, know about his wife | ‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ताला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मागितलं खास 'रिटर्न गिफ्ट'

‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ताला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मागितलं खास 'रिटर्न गिफ्ट'

Next
ठळक मुद्देसुहासच्या पत्नीबद्दल सांगायचे तर   सुहासच्या ख-या आयुष्यातील पत्नीचे नाव स्नेहा माजगांवकर असून ती दिसायला खूपच सुंदर आहे.

 ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale ) ही मालिका प्रचंड गाजली. पहिला सीझन गाजलाच, दुस-या सीझनलाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, पांडू या सगळ्या व्यक्तिरेखाही लोकप्रिय झाल्यात. आज आम्ही या मालिकेतील दत्ताबद्दल सांगणार आहोत.अर्थात दत्ताची भूमिका साकारणारा अभिनेता सुहास शिरसाट (Suhas Shirsat) याच्याबद्दल. कारण आज त्याचा वाढदिवस.
10 जून 1981 रोजी सुहासचा जन्म झाला. सुहासच्या वाढदिवसाला त्याची पत्नी स्रेहा माजगावकर हिने आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुहासचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. हा व्हिडीओ स्नेहाने स्वत: शूट केला आहे. हॅपी बर्थ डे... असाच मी म्हणेन ते करत राहा..., असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे.

 ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये सुहासने दत्ताची भूमिका अशी काही जिवंत केली होती की, आजही लोक त्याला दत्ता म्हणूनच ओळखतात. बीडच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या दत्ताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. नाटकात काम करता करता त्याला सिनेमे मिळत गेलेत आणि यानंतर सुहासने कधीच मागे वळून बघितले नाही.

सुहासने रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या आधी 20-25 चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खºया अर्थाने लोकप्रियता या मालिकेनेच मिळवून दिली. विशेष म्हणजे तो मुळचा बीडचा असला तरी या मालिकेत अस्खलित मालवणी भाषेत बोलतो. 

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत सुहासला कशी संधी मिळाली तर त्याच्या नाटकामुळेच. ‘खेळीमेळी’ या नाटकाचे प्रयोग सुरु असतानाच सुहासला ‘रात्रीस खेळ चाले’त काम करण्याची संधी मिळाली. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण बॉलिवूडच्या ‘कमीने’ या शाहिद कपूर स्टारर सिनेमासाठी सुहासने पहिलं आॅडिशन दिले होते. एका दृष्टीहिन दिव्यांगाची भूमिका साकारायला मिळावी, हे त्याचे स्वप्न आहे. स्वप्नातील भूमिका म्हणतात तशी. याशिवाय ‘सखाराम बार्इंडर’मधील सखाराम ही भूमिका जिवंत करण्याचीही त्याची इच्छा आहे. सुहासला फिरायला, मित्रांना भेटायला प्रचंड आवडते. आईच्या हातच्या हिरव्या पालेभाज्यांची चव त्याच्या जीभेवर सतत रेंगाळते.

सुहासच्या पत्नीबद्दल सांगायचे तर   सुहासच्या ख-या आयुष्यातील पत्नीचे नाव स्नेहा माजगांवकर असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच  अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे आणि सुहासचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. स्नेहा देखील एक अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती झी युवाच्या ‘कट्टी बट्टी’ या मालिकेत झळकली होती. ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ratris khel chale datta naik aks suhas shirsat birthday special, know about his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app