अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकताच प्रियानं इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. 

प्रियाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. हा फोटो शेअर करून प्रियानं लिहिलं की, पारंपारिक भारतीय वेशातून थोडा ब्रेक घेतला आहे. या सुंदरतेची प्रशंसा करण्यासाठी रोखू शकत नाही.

प्रिया बापटच्या या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत. तिच्या या फोटोवर सेक्सी, जलपरी व सुंदर अशा कमेंट्स चाहते करत आहेत.


 
काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. नागेश कुकुनूर यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले होते. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. 

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे.


Web Title: Priya Bapat shared photo on Instagram, her fans commenting on photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.