​प्रार्थना बेहरे सांगतेय, जानेवारीपर्यंत मी काही परतणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 11:35 AM2017-12-08T11:35:10+5:302017-12-08T17:05:10+5:30

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री ...

Prayer tells me that till January, I will not return | ​प्रार्थना बेहरे सांगतेय, जानेवारीपर्यंत मी काही परतणार नाही

​प्रार्थना बेहरे सांगतेय, जानेवारीपर्यंत मी काही परतणार नाही

googlenewsNext
फी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नुकतीच रेशीमगाठीत अडकली आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचे शुभमंगल नुकतंच गोव्यात पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला प्रार्थनाचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील तिच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. वैभव तत्त्ववादी, प्रिया मराठे, सोनाली कुलकर्णीसह प्रार्थनाच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धमाल केली. त्यांनी सगळ्यांनी प्रार्थनाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 
प्रार्थनाचे लग्न गोव्यात झाले होते. आता ती हनिमूनला देखील एखाद्या समुद्रकिनाऱ्याच्या परिसरातच गेली आहे. पण ती हनिमुनला कुठे गेली हे तिने तिच्या चाहत्यांना सांगितलेले नाहीये. केवळ तिने इन्स्टाग्रामला काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोवरून ती समुद्रकिनारी फिरत असल्याचे दिसत आहे. ती जानेवारीपर्यंत तिथून परतणार नसल्याचे तिने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. प्रार्थनाने कामातून वेळ काढून अभिषेकसोबत तिचा क्वालिटी टाइम घालवायचा ठरवला आहे. 
अभिषेक आणि प्रार्थना यांचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. एका मॅरेज ब्युरोमधून या दोघांचे लग्न जुळले. मात्र प्रार्थना आणि अभिषेकमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मने जिंकली. यानंतर 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. यामुळे तिच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. लग्नानंतरही सिनेसृष्टीत काम करणार असल्याचे प्रार्थना बेहरे हिने सांगितले. आगामी काळात हिंदी सिनेमांकडेही लक्ष केंद्रीत करण्याचे तिने ठरवले आहे.

Also Read : पाहा प्रार्थना बेहरेच्या लग्नाचे Inside Photo

Web Title: Prayer tells me that till January, I will not return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.